लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणासोबत वाढदिवस साजरा करणे तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीला गुंगीचे औषध देत पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
तरुणीच्या आरोपानुसार, आरोपीने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा वरळीच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिला गुंगीचे औषध घालून पेय दिले. ते प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. तेव्हा माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. शुद्धीवर आल्यानंतर ती रूममध्ये एकटीच होती. याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी आधी डॉक्टरकडे जात नंतर जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा गुन्हा वरळीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी तो वरळी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.