दुर्मिळ नाईटजार पक्ष्याला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:53+5:302021-06-19T04:05:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अत्यंत दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या नाईटजार या पक्ष्याला मुंबईच्या परळ परिसरातून जीवदान मिळाले. परळ येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्यंत दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या नाईटजार या पक्ष्याला मुंबईच्या परळ परिसरातून जीवदान मिळाले.
परळ येथील रहिवासी गिरीश पाताडे व ओमकार मगर यांना मंगळवारी हा पक्षी परळ परिसरात अशक्त अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने पक्षिप्रेमी योगेश शिरोडकर यांना याबद्दल माहिती दिली. योगेश यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्या नाईटजारला राणीच्या बागेतील झूओलॉजिस्ट अभिषेक साटम यांच्याकडे संगोपन व उपचारासाठी सोपविण्यात आले. साटम यांच्या देखरेखीखाली राणीच्या बागेत हा नाईटजार पक्षी आता सुखरूप आहे.
पक्षिप्रेमी योगेश शिरोडकर यांनी सांगितले की, नाईटजार हा दुर्मिळ प्रजातीचा वन्यपक्षी मुंबईसारख्या शहरात आढळणे दुर्मिळ गोष्ट आहे. ज्यावेळी या पक्ष्याची सुटका केली त्यावेळी ताे खूपच अशक्त असल्याने उडण्यास असक्षम होता. मात्र वेळीच त्याला वाचविल्यामुळे आता तो सुरक्षित आहे. अशा दुर्मिळ प्रजातीचे पक्षी नामशेष होणार नाहीत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. पक्ष्यांना वाचविण्यासाठी आमच्यातर्फे सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
.....................................................