अस्सलतेबद्दल शंका असलेल्या दुर्मीळ चित्राला अखेर मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:33 AM2021-02-01T02:33:59+5:302021-02-01T02:34:34+5:30

Mumbai News : विख्यात दिवंगत चित्रकार भूपेन खखर यांच्या मृत्यूपश्चात बनावट म्हणून हिणवले गेलेले मृत्यूची सावली हे चित्र दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्सलच असल्याचे अनेक पुराव्यांसह सिद्ध करण्यात त्यांच्या मित्रवर्यांनी अखेर यश मिळवले आहे.

The rare picture with doubts about authenticity finally got justice | अस्सलतेबद्दल शंका असलेल्या दुर्मीळ चित्राला अखेर मिळाला न्याय

अस्सलतेबद्दल शंका असलेल्या दुर्मीळ चित्राला अखेर मिळाला न्याय

googlenewsNext

मुंबई : विख्यात दिवंगत चित्रकार भूपेन खखर यांच्या मृत्यूपश्चात बनावट म्हणून हिणवले गेलेले मृत्यूची सावली हे चित्र दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्सलच असल्याचे अनेक पुराव्यांसह सिद्ध करण्यात त्यांच्या मित्रवर्यांनी अखेर यश मिळवले आहे.

 मनस्वी चित्रकार म्हणून ओळखले जाणाऱ्या भूपेन खखर यांनी  चित्रकला विश्वात खळबळ निर्माण करणारी अनेक चित्रे साकारली. आपल्या कलेच्या माध्यमातून समलैंगिकतेचे समर्थन करणारे ते कलाकार होते. २00३ साली त्यांचे कर्करोगाने निधन झाले. मृत्यूपूर्वी खखर यांनी बालमित्र गुलाम हुसेन मुरदशाह यांच्याकडे आपले मृत्यूची सावली हे चित्र सोपवले होते. 

त्या चित्रामागे खखर यांनी स्वहस्ताक्षरात जीवन आणि मृत्यूबद्दलचे आपले विचार लिहिले होते. दोन वर्षांपूर्वी मुरादशाह यांनी ते चित्र प्रदर्शनासाठी काढले तेव्हा खखर यांच्या त्या चित्राच्या अस्सलतेबद्दल तिघा बड्या चित्रकारांनी शंका व्यक्त केली. मुरादशाह यांच्याकडील ते चित्र खखर यांचे नसावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे मृत्यूची सावली या चित्राची विश्वासार्हता कमी झाली. मुरादशाह यांच्यावर खूप टीका झाली आणि प्रसिद्धिमाध्यमांनी ती उचलून धरली.  

   मात्र तेव्हापासून बालमित्राच्या चित्रावरील अन्यायाने व्यथित झालेल्या मुरादशाह आणि निकटवर्तीयांनी मृत्यूची सावली हे चित्र खखर यांचे अस्सल चित्रच असल्याचे सिद्ध करण्याचा चंग बांधला. दोन वर्षांत त्यांनी याबाबत अनेक पुरावे गोळा केले. 
खखर यांनी मुरादशाह यांना १९६९ सालापासून आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली अनेक पत्रे, वचनपत्र, मृत्यूची सावली चित्रामागील हस्ताक्षर यांचा आधार घेण्यात आला. 

याबाबत फॉरेन्सिक अहवाल मागवण्यात आला. त्या अहवालात त्या चित्रामागील हस्ताक्षर खखर यांचेच असल्याला निर्वाणा देण्यात आल्याने ते चित्र असल्याचे सिद्ध झाले.

याबाबत मुरादशाह यांचे वकील अ‍ॅड. फिरदोश इराणी म्हणतात, ‘आता हे स्पष्ट दिसते आहे की या चित्राला बनावट म्हणणारा कंपू पूर्णपणे चुकीचा होता. खखर यांचे चित्र बनावट असल्याची अफवा पसरवणारा गट कलाविश्वातल्या जातीव्यवस्थेसारखा आहे. कलाविश्वात असे प्रकार थांबणे आवश्यक आहे.

‘मी लहानपणापासून शेवटच्या दिवसांपर्यंत भूपेन खखरसोबत होतो आणि जेव्हा तो कर्करोगाशी झुंजत होता तेव्हा बहुतेक तथाकथित मित्रांनी त्याची साथ सोडली होती.  मी एक सामान्य व्यक्ती असल्याने काहींनी कलाकृतीच्या सत्यतेबद्दल अफवा पसरवल्या. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. दोन वर्षांनी का होईना खखर यांच्या चित्राला न्याय मिळाला याचे मला समाधान आहे’, अशा शब्दात मुरादशाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: The rare picture with doubts about authenticity finally got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई