रेशनिंगच्या धान्याचा टेम्पो पकडला

By admin | Published: November 3, 2014 12:30 AM2014-11-03T00:30:57+5:302014-11-03T00:30:57+5:30

विक्रमगडहून डहाणू उधवा मार्गाने रेशनिंगचे तांदुळ, गहू यांनी भरलेला धान्याचा ट्रक सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी शिलोंडा रायपूर मार्गावर काजळबारी येथे पकडल्याचा प्रकार रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडला

Rashtang's grain tempo seized | रेशनिंगच्या धान्याचा टेम्पो पकडला

रेशनिंगच्या धान्याचा टेम्पो पकडला

Next

डहाणू : विक्रमगडहून डहाणू उधवा मार्गाने रेशनिंगचे तांदुळ, गहू यांनी भरलेला धान्याचा ट्रक सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी शिलोंडा रायपूर मार्गावर काजळबारी येथे पकडल्याचा प्रकार रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडला. सीपीएम कार्यकर्त्यांनी कासा पोलीस निरीक्षक मगर यांना कळवताच त्यांनी ताबडतोब पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून रेशनिंगचे धान्य भरलेला ट्रक कासा पोलिसांनी ताब्यात घेतला.
यासंदर्भात सुगदू पारससिंग राजपूत या ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जबानीनुसार महालक्ष्मी अ‍ॅग्रो फूड सोलशेत, ता. विक्रमगड येथून अनमोल राईस मिल खानवेल येथे हा ट्रक जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये १७० बॅग गहू आणि ३७ अशा २०७ बॅग आढळून आल्या आहेत. मात्र सदरच्या धान्यांच्या गोणींवर रेशनिंगच्या धान्याचा शिक्का आढळून न आल्या कारणाने हे धान्य रेशनिंगचेच आहे का? याबात अधिकाऱ्यांनी साशंकता निर्माण झाली होती.
रविवारी सदर क्रमांकाचा रेशनिंगने भरलेला ट्रक खानवेलाला जाणार असल्याची माहिती सीपीएम कार्यकर्त्यांना मिळाली होती.२५ जणांनी पाळत ठेवून ही रविवारी पहाटे ट्रक पकडून कामगिरी केली. ही बाब महसूल विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पोलिसांनी हे महसूल खात्याला कळवल्यानंतर डहाणू पुरवठा अधिकारी समद शेख, पाटील आणि कर्मचाऱ्यांनी सदरप्रकाराची माहिती मिळवली. मात्र सदरचे धान्याची उचल विक्रमगड तालुक्याच्या हद्दितून झाल्याने गुन्हा नेमका कोणत्या पुरवठा अधिकाऱ्यांनी दाखल करावा या वाद झाला. त्यामुळे सीपीएमचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.

Web Title: Rashtang's grain tempo seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.