राष्ट्रवादी व मनसेत धक्काबुक्की

By admin | Published: October 12, 2014 01:02 AM2014-10-12T01:02:49+5:302014-10-12T01:02:49+5:30

वाशीत राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकत्र्यात वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.

Rashtravadi and Manket Dhakabukki | राष्ट्रवादी व मनसेत धक्काबुक्की

राष्ट्रवादी व मनसेत धक्काबुक्की

Next
>नवी मुंबई : वाशीत राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकत्र्यात वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान शहरातील विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. मनसे उमेदवाराने महापौरांना अपशब्द वापरल्याने हा वाद निर्माण झाला.
खाजगी वृत्तवाहिनीतर्फे वाशी येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रत बेलापूर विधानसभेतील सर्वपक्षीय उमेदवारांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रत्येक पक्षाची ध्येयधोरणो यावर चर्चा झाल्यानंतर शहरातील समस्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात होते. यावेळी मनसेचे उमेदवार गजानन काळे हे पालकमंत्री तथा बेलापूरचे उमेदवार गणोश नाईक यांच्यावर आरोप करीत होते. यावेळी महापौर सागर नाईक हे पालकमंत्र्यांचे नाव घेऊ नका, असे काळे यांना सांगत होते. हे सांगताना महापौरांनी काळे यांच्याकडे बोट दाखवले. त्यामुळे काळे यांनी महापौरांना चल हट असा अपशब्द वापरला. या प्रकाराने कार्यक्रमाच्या ठिकाणीच राजकीय आखाडा झाला होता.
 कार्यक्रमास उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला मारण्यासाठी धावून आले होते, असे काळे यांनी सांगितले. मात्र आपल्याला वाचवण्यासाठी मनसेच्या महिला पदाधिकारी धावून आल्या. वेळीच काळे हे तेथून निसटल्याने त्यांना मारहाण झाली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने कार्यक्रम ठिकाणच्या खुच्र्याचीही मोडतोड झाली. त्यामध्ये आपल्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे मनसे पदाधिकारी आरती धुमाळ यांनी सांगितले, तर राष्ट्रवादीचा हा प्रकार मुस्कटदाबीचा असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.  यासंदर्भात निवडणूक अधिकारी, महिला आयोग व पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आपल्याला मारण्यासाठी धावून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक भरत नखाते, राजू शिंदे व  त्यांच्या कार्यकत्र्याविरोधात तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
वाशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. 
अनेक पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमणार असल्याने तेथे वादाची शक्यता असते. यामुळे पोलिसांना आगाऊ कळवणो आवश्यक आहे.त्याकरिता कार्यक्रम आयोजकांनी पोलिसांना कळवले असते तर तेथे पोलीस बळ पुरवले असते. त्यामुळे वादाचा प्रकार टळला असता असे वाशी पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले.   (प्रतिनिधी)
 
शहरातील समस्या मांडत असताना महापौर नाईक हे आपल्याला बोट दाखवून धमकावत होते. यापूर्वीच्याही कार्यक्रमांमध्ये महापौरांची अशीच आक्रमकता होती. त्यामुळे महापौरांच्या दमदाटीकडे दुर्लक्ष करून चर्चा सुरू ठेवण्यासाठी आपण चल हट असे म्हणालो. 
- गजानन काळे, मनसे बेलापूर उमेदवार
 
दुस:यांच्या आरोपांचा आधार घेऊन काळे हे पालकमंत्र्यांवर आरोप करत होते. त्यामुळे पुरावे समोर ठेवून त्यांनी बोलावे असे महापौर सांगत होते. यावेळी काळे यांनी महापौरांना चल हट असा अपमानास्पद शब्द वापरला. त्यानंतर मनसेचेच कार्यकर्ते महापौरांवर धावून आले. केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी त्यांनी केलेला हा स्टंट आहे. शहराच्या प्रथम नागरिकाविषयी अपमानास्पद शब्द काढणो चुकीचे आहे.
- राजू शिंदे, राष्ट्रवादी नगरसेवक

Web Title: Rashtravadi and Manket Dhakabukki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.