रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स घोटाळा : दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:22 AM2019-11-12T04:22:28+5:302019-11-12T04:22:32+5:30
घाटकोपरमधील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स घोटाळ्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जयेश रसिकलाल शाह आणि निलेश रसिकलाल शाह अशी त्यांची नावे आहेत.
मुंबई : घाटकोपरमधील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स घोटाळ्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जयेश रसिकलाल शाह आणि निलेश रसिकलाल शाह अशी त्यांची नावे आहेत.
रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सने शेकडो गुंतवणूकदारांकडून महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची योजना सुरु करुन पैसे घेतले होते. अकरा महिन्याचे हफ्ते भरा आणि बारावा हफ्ता आम्ही भरु या योजनेअंतर्गत या ज्वेलर्सने अनेक ग्राहक जोडले होते. अनेक ग्राहकांकडून मुदत ठेवीही घेतल्या होत्या. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जादा व्याजदर मिळेल असे आश्वासन या ज्वेलर्सने गुंतवणुकदारांना दिल्याने शेकडो ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या ज्वेलर्सकडे केली होती. या रकमेतून ज्वेलर्सने सोने खरेदी केले. ग्राहकांनी थेट दुकानावर धडक मारल्यानंतर पैसे परत करण्यासाठी २४ तासाचा वेळ ज्वेलर्सच्या मालकांना दिला होता.
ज्वेलर्सचे संचालक जयेश शाह यांना निर्धारित वेळेत ग्राहकांचे पैसे परत करता आले नाही.