Join us

रतन टाटा यांना गेले बाराशे रुपयांचे ई चलान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:06 AM

बनावट वाहन क्रमांक प्रकरण : महिलेची आज होणार चौकशीरतन टाटा यांना गेले बाराशे रुपयांचे ई चलानबनावट वाहन ...

बनावट वाहन क्रमांक प्रकरण : महिलेची आज होणार चौकशी

रतन टाटा यांना गेले बाराशे रुपयांचे ई चलान

बनावट वाहन क्रमांक प्रकरण : महिलेची आज होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी उद्योजक रतन टाटा यांच्या वाहन क्रमांकाचा वापर केल्यामुळे रतन टाटा यांना बाराशे रुपयांचे ई चलान गेल्याची माहिती तपासात समोर आली. संबंधित मे. नरेंद्र फॉर्वड्रेस कंपनीच्या संचालिकेला पाेलिसांनी गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थेट रतन टाटा यांना ई चलानचे संदेश धडकू लागल्याने, पथकाने तपास सुरू केला. तपासात तो क्रमांक रतन टाटा यांच्या वाहनांवरील नसून मे. नरेंद्र फॉर्वड्रेस कंपनीच्या संचालिकेच्या वाहनावरील असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध बनावट वाहन क्रमांकाचा वापर करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंकशास्त्राचा फ़ायदा घेण्यासाठी मूळ वाहन क्रमांक बदलून या क्रमांकाचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले.

रतन टाटा यांना या प्रकारामुळे एकूण बाराशे रुपयांचे ई चलान गेले. तसेच याप्रकरणात संबंधित कारचालकाचा जबाब नोंदविण्यात आला असून, गुरुवारी संबंधित संचालिकेला चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.