मालाड ते दहिसर कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर सरासरीहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:46 AM2020-06-11T02:46:35+5:302020-06-11T02:46:43+5:30
चिंता वाढली : मालाड सर्वाधिक ५.९ टक्के, दहिसर ५.७ टक्के
मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण दररोज वाढण्याचे प्रमाण मुंबईत सरासरी २.८ टक्के एवढे आहे. या तुलनेत शहर भागातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी आणण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. मात्र पश्चिम उपनगरात विशेषत: मालाड ते दहिसर या भागात अद्याप रुग्ण वाढण्याचे प्रमाण ४.१ ते ५.७ टक्के एवढे आहे. यापैकी मालाडमध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५.९ टक्क्यांनी वाढत आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहर भागातच रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत होते. पालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून आता २४ दिवसांवर पोहोचले आहे. तर दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाण मुंबईत सध्या सरासरी २.८ टक्के एवढे आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी - प्रभादेवी, धारावी, भायखळा या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाण सरासरी दोन टक्के अथवा त्याहून कमी झाले आहे. मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागांमध्ये हे प्रमाण दुप्पट आहे.
मुंबईत आतापर्यंत ५० हजार ८७८ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २२ हजार ६७८ रुग्णांची तब्येत सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या २५ हजार ५६२ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र अन्य विभागांच्या तुलनेत मालाड ते दहिसर या भागातील रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, पालिकेमार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे पश्चिम उपनगरातील रुग्ण वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.
टॉप विभाग (रुग्णवाढ सरासरीहून कमी)
विभाग रुग्ण डिस्चार्ज टक्केवारी
(भायखळा, नागपाडा) २९८९ १५५९ १.४
एफ/उत्तर (सायन, वडाळा) ३००१ १४३८ १.४
जी उत्तर (धारावी, माहीम) ३५६८ २१४० १.६
एच/पूर्व (वांद्रे पूर्व) २७२६ १३५८ १.६
जी/दक्षिण (वरळी, प्रभादेवी) २४७२ १३८९ १.७
रुग्ण वाढण्याची टक्केवारी
विभाग रुग्ण डिस्चार्ज टक्केवारी
पी उत्तर (मालाड) २३५३ ६९० ५.९
आर/दक्षिण(कांदिवली) १५५८ ५२७ ४.१
आर मध्य बोरीवली १२७६ ३७० ४.३
आर उत्तर (दहिसर) ७१५ १९५