मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५११ दिवसांवर पोहोचला आहे. २९ मे ते ४ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे.
मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत दिवसभरात ८६६ रुग्ण आणि २९ मृत्यू झाले आहेत. मागील २४ तासांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १ हजार ४५ आहे, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७७ हजार ६४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात सध्या १६ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत ७ लाख १० हजार ८०७ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या १५ हजार १८ आहे. दिवसभरात २६ हजार ६६९ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ६३ लाख ९८ हजार ६६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात २७ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ११६ आहे.