पुन्हा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८५ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:15 AM2022-01-14T07:15:37+5:302022-01-14T07:15:42+5:30

दिवसभरातील १३ हजार रुग्णांपैकी ११ हजार ५१० रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे.

The rate of recovery is higher; The overall growth rate in Mumbai is 1.85 per cent | पुन्हा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८५ टक्के

पुन्हा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८५ टक्के

Next

मुंबई :  मुंबईत पुन्हा एकदा रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शहर उपनगरात गुरुवारी १३,७०२ आहे, तर ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २०,८४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ८ लाख ५५ हजार ८११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्के आहे. ६ ते १२ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८५ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६ दिवसांवर आहे.

दिवसभरातील १३ हजार रुग्णांपैकी ११ हजार ५१० रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ६९ हजार ९८९ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १६ हजार ४२६ इतका आहे. पालिकेने २४ तासांत ६३,०३१ चाचण्या केल्या असून एकूण १,४४,५५,५१४ चाचण्या केल्या आहेत. शहर-उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६१ आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील २३ हजार ३७४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

Web Title: The rate of recovery is higher; The overall growth rate in Mumbai is 1.85 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.