मुंबई : आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या खिशातही हात घालणारा बसपास दरवाढीचा निर्णय अखेर बेस्ट प्रशाासनाने मागे घेतला आहे़ या दरांमध्ये आता १७ ते ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे़ या प्रस्तावाला बेस्ट समितीने हिरवा कंदील दाखविला तरी पालिका महासभेच्या शिक्कामोर्तब झाल्यानंतर नवीन दर अमलात येतील. बेस्टने यंदा दोन वेळा केलेल्या भाडेवाढीत शालेय विद्यार्थ्यांना बसपासच्या दरांतही मोठी वाढ केली़ ही दरवाढ कमी करण्यासाठी राजकीय दबावही वाढला़ विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालेय वस्तूंमध्ये २८ वा प्रकार म्हणून बसपासही मोफत देण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली होती़ याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीने पलिकेकडे पाठविला आहे़ हा निर्णय होईपर्यंत बसपासच्या दरांमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने मंजूर केला आहे़ नव्या दरांमध्ये पहिल्या १० कि़मी़ अंतरासाठी वार्षिक दोन हजारांवरून १६०० रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे़ पालिकेच्या विद्यार्थ्यांना बेस्टचा प्रवास मोफत असेल. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचा मासिक बसपास १७५ रु़, त्रैमासिक ५०० रु़, सहामाही ९०० रु़ आकारणार आहे़ मंजुरीनंतर नवे दर बेस्टने खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विशेष बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे़ पहिल्या १० कि़मी़साठी असलेला २,४०० रुपये बसपास दोन हजार रुपये करण्यात आला आहे़ यातही कपात करून ही रक्कम १,६०० रुपये करण्याची सूचना सदस्यांनी केली आहे़
कपातीनंतर शाळांसाठी नवीन दरप्रकारमासिक त्रैमासिक सहामाहीपालिका १५० ४५० ७५०खासगी १७५ ५०० ९००