'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:49 IST2025-01-23T15:48:38+5:302025-01-23T15:49:39+5:30

सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली.

'Rather than being happy that Saif Ali Khan's life was saved, some politicians...'; Shiv Sena leader said | 'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं

'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं

'सैफ अली खान सिंहासारखा चालत आला म्हणून काही राजकारणी आणि माध्यमे पोलीस दलाबद्दल प्रश्न उपस्थित करताहेत', असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सर्वात आधी सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केली होती. त्यानंतर भाजपचे मंत्री निलेश राणे यांनीही हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावर शायना एसनी यांनी भाष्य केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी म्हणाल्या, "मणक्याजवळ चाकू लागला आणि ८ वर्षाच्या मुलासोबत सैफ अली खान एखाद्या सिंहासारखा चालत आला. तो अभिमानाने वाघासारखा चालत आला."

"आनंदी होण्यापेक्षा..."

"खरंतर त्याचा जीव वाचला म्हणून आनंदी होण्यापेक्षा, मला कळत नाही काही माध्यमे आणि काही राजकारणी पोलिसांच्या एकनिष्ठपणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या उच्चभ्रू प्रकरणातील व्यक्तीच्या सुरक्षेबद्दल बोलायला हवं', असे शायना एनसी म्हणाल्या. 

सैफ अली खानवरील हल्ल्यावर निरुपम, राणेंनी व्यक्त केली शंका

शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सर्वात आधी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केली होती. अडीच चाकू घुसून सैफ अली खान इतका पटकन बरा कसा झाला आणि चालत कसा गेला, अशी शंका निरुपम यांनी व्यक्त केली होती. 

मंत्री नितेश राणे यांनीही या प्रश्नावर भाष्य करताना म्हटले की, "आज सैफ अली खानला पाहिल्यानंतर मला संशय आला. तो बाहेर येऊन असा चालत होता की, मलाच शंका आली की याला खरंच चाकू मारला की, अभिनय करत होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर चालत होता. वाटतंच नव्हतं की, त्याच्यावर चाकू हल्ला झाला आहे."

Web Title: 'Rather than being happy that Saif Ali Khan's life was saved, some politicians...'; Shiv Sena leader said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.