Join us

टीका करण्यापेक्षा कायदेशीर त्रुटी दाखवा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:12 IST

Rahul Narvekar News: बिनबुडाची टीका करण्यापेक्षा माझ्या निर्णयातील कायदेशीर चूक दाखवून देण्याची धमक उद्धव ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाडांमध्ये नाही. संजय राऊतांचा तर तो विषयच नाही, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

मुंबई  - बिनबुडाची टीका करण्यापेक्षा माझ्या निर्णयातील कायदेशीर चूक दाखवून देण्याची धमक उद्धव ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाडांमध्ये नाही. संजय राऊतांचा तर तो विषयच नाही, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

पक्षांतरबंदी कायद्याच्या चिकित्सेसाठी नेमलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद नार्वेकरांना देण्यात आल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. नार्वेकरांची नियुक्ती ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका ठाकरे यांनी केली. त्यावर नार्वेकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नार्वेकर म्हणाले,  बिनबुडाची टीका करण्यापेक्षा मी दिलेल्या निर्णयात काय कायदेशीर चूक आहे, हे दाखविण्याची धमक ठाकरे, आव्हाडांमध्ये नाही. पक्षांतर बंदीबाबतच्या समितीवर महाराष्ट्रातील व्यक्तीची नियुक्ती झाली याचा ठाकरे यांना आनंद व्हायला हवा होता. कदाचित ठाकरे यांना राज्याबद्दल अस्मिता नाही. त्यांचे माझ्यावरील प्रेम जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो, असेही नार्वेकर म्हणाले.

टॅग्स :राहुल नार्वेकरमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष