Join us

शिधावाटप दुकानाचा परवाना होणार रद्द?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:48 AM

अरेरावी करणाऱ्या निरीक्षकाच्याही चौकशीचे आदेश; सहायक शिधावाटप आयुक्तांची माहिती

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : राठोडीमध्ये शिधावाटप दुकानाविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर त्याचा परवाना रद्द करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली जात आहेत. तसेच अरेरावी करत तक्रारदाराला तक्रार मागे घेण्यास सांगणाºया शिधावाटप निरीक्षकाचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहायक शिधावाटप आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मालाड पश्चिमच्या राठोडी व्हिलेजमध्ये नीलिमा को. आॅप. सोसायटीमधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ येथे मोठ्या प्रमाणात होणाºया काळाबाजाराबाबत २२ एप्रिल आणि २३ एप्रिल, २०२० रोजी ‘लोकमत’मध्ये ‘राठोडीच्या शिधावाटप दुकानात घोळ’ तसेच ‘तुम्ही तुमचं बघा आणि तक्रार मागे घ्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना धान्य नाकारणाºया दुकानदारावर कारवाई करण्याचे सोडून शिधावाटप निरीक्षक अभिजीत बोरोडे हे तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदारावरच कसा दबाव टाकतात हे दोघांच्या संभाषण ‘आॅडियो’ च्या मदतीने ‘लोकमत’ने उघड केले होते.त्यानुसार मुंबई आणि ठाणे विभागाचे सहायक शिधावाटप आयुक्त कैलास पगारे यांच्या आदेशाने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील प्रधान कार्यालयातून सहायक शिधावाटप अधिकारी अमर सपकाळे, निरीक्षक भगवान खंडेराव, निरीक्षक सुशील साळसकर, निरीक्षक संदीप बागवे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक राठोडीच्या नीलिमा को. आॅप. सोसा.मधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ या ठिकाणी येऊन धडकले. त्या वेळी बोरोडे यांनाही त्या ठिकाणी बोलावण्यात आले. या पथकाने बोरोडे, तक्रारदार सुरेश वाघमारे यांचा जबाब नोंदवून घेतला. दुकानाची पाहणी व पंचनामा करून दुकानदार आणि दोषी अधिकाºयावर योग्य ती कारवाई करण्याबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सादर करू, असे त्यांनी वाघमारे यांना सांगितले.मालाड रेशन दुकान तसेच अधिकारी अरेरावी प्रकरणी मी शिधावाटप विभागाच्या ग परिमंडळचे उपनियंत्रक सुहास शेवाळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यात आढळणाºया दुकानदार तसेच अधिकाºयावर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.- कैलास पगारे, सहायक शिधावाटप आयुक्त, मुंबई आणि ठाणे विभागबेजबाबदार अधिकाºयांवर बसेल अंकुश! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राठोडीचे रेशन दुकान सतत बंद ठेवणे,कार्डधारकांना धान्य न देणे, फलक दर्शनी भागात नसणे, अन्नधान्याची पावती न देणे तसेच कार्ड धारकांना मोफत मिळणारे तांदूळ देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे या दुकानाचा परवानाच रद्द केल्यास अन्य दुकानदार सावध होतील. तसेच बोरोडेसारख्या बेजबाबदार लोकांनाही चांगलाच धडा मिळेल.- सुरेश वाघमारे, तक्रारदार