रत्नागिरी जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी करणारा अटकेत
By admin | Published: September 30, 2014 09:40 PM2014-09-30T21:40:01+5:302014-09-30T21:40:01+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी करणारा अटकेत
Next
र ्नागिरी जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी करणारा अटकेतमुंबई: रत्नागिरी येथील लांजा येथील मंदिरांमध्ये चोरी करणार्या सराईत चोराला बोरीवली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. उदय कोलते(४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. उदयकडून ७ लाख ५४ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्हयात उदय विरोधात तब्बल ३५ गुन्हयांची नोंद आहे. रविवारी बोरीवली पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाख घार्गे हे गस्त घालत असताना चोरी केलेली मालमत्ता घेऊन एक व्यक्ती बोरीवलीच्या शिंपोली येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कोलतेला ताब्यात घेतले. त्याला चौकशीकरता पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी कसून चौकशी असता, उदयने २३ सप्टेंबर रत्नागिरी जिल्हयातील अथलेश्वर आणि कालभैरव मंदिरामध्ये सचिन उर्फ बंडया धनाजी भुवडच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. उदयविरोधात मंदिरात चोर्या आणि घरफोडीचे मिळून ३५ गुन्हयांची नोंद आहे. पोलिसांनी उदयकडून सोन्याच्या पुतळ्या, लॉकेट, कानातील फुले, चांदीच्या देव-देवतांच्या मूर्ती, असे मिळून ७ लाख ५४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. पोलिसांनी उदयला सोमवारी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान रत्नागिरीतील नागरिकांचे ग्रामदैवत असलेल्या अथलेश्वर आणि कालभैरव मंदिरामध्ये चोरी प्रकरणानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. चोरीस गेलेली मालमत्ता पोलिसांनी लवकरात लवकर हस्तगत करावी, याकरता स्थानिकांनी मंदिरात ठिय्या आंदोलन देखील केले होते. (प्रतिनिधी)