रत्नागिरी--पावणे दहा कोटींची थकबाकी
By admin | Published: August 20, 2014 09:58 PM2014-08-20T21:58:52+5:302014-08-20T21:58:52+5:30
कोकण परिमंडल : रत्नागिरी जिल्ह्यात सव्वासहा कोटींची तर सिंधुदुर्गात पावणेचार कोटींची लाखाची थकबाकी
रत्नागिरी : वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणकडून विशेष पथक तैनात कण्यात आले आहे. एकीकडे वीज चोरीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न महावितरण करीत असताना दुसरीकडे ग्राहकांकडून वीजबिले थकविण्यात येत आहेत. त्यामुळे महावितरणपुढे थकबाकी वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे. कोकण परिमंडलातील ९० हजार ४७४ ग्राहकांकडे अजूनही ९ कोटी ८२ लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५४ हजार ५८८ ग्राहकांकडे ६ कोटी १३ लाख ४३ हजार रूपयांची थकबाकी राहिली आहे. ७१५ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ३२ लाखाची थकबाकी आहे. वाणिज्य प्रकारातील ६२२४ ग्राहकांकडे १ कोटी १८ लाखाची थकबाकी आहे. १४०१ औद्योगिक ग्राहकांकडे ७१ लाख, १३८७ शेतीपंप ग्राहकांची ११ लाख २० हजार, ८९० सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांची ५४ लाख ४० हजार, अन्य ७६५ ग्राहकांकडे ११ लाख ७१ हजार, २०६ पथदीप असलेल्या ग्राहकांकडे १३ लाख ७१ हजाराची थकबाकी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ हजार ७५९ ग्राहकांकडे ३ कोटी ६९ लाखाची थकबाकी आहे. घरगुती प्रकारातील २७ हजार १६४ ग्राहकांकडे १ कोटी ८८ लाखाची थकबाकी आहे. ३७०९ वाणिज्य ग्राहकांकडे ७१ लाख १७ हजार, ९२३ औद्योगिक ग्राहकांकडे ४३ लाख, ३००८ शेतीपंपाचे २२ लाख ३२ हजार, ६०५ सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचे २९ लाख ५८ हजार, २५४ पथदिव्यांचे १८ लाख, तर ९६ अन्य ग्राहकांकडून ३ लाख ४४ हजार रूपये थकविण्यात आले आहेत.
दरमहा वीज वापराचे वीजबिल ग्राहकांना देण्यात येते. बँका, पोस्ट कार्यालये व महावितरणच्या उपकेंद्रातून वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शिवाय स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र रत्नागिरी, चिपळूण, खेड, कणकवली, वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आल्यामुळे सुटीच्या दिवशीही ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य झाले आहे.
मात्र, कोकणातील बहुतांश मंडळी नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात राहतात. त्यामुळे बहुधा घरे बंद असतात. परंतु महावितरणकडून इंटरनेटव्दारे आॅनलाईन वीजबिल स्वीकारण्यात येत आहे. आॅनलाईनचा फायदादेखील ग्राहकांना घरबसल्या होऊ लागला आहे. परंतु तरीही ग्राहकांकडून देयके थकविण्यात आली आहेत. यामुळे पुढील काळात याबाबत अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
उपकेंद्रथकबाकी
वेंगुर्ला२८ लाख ३६ हजार
कुडाळ६८ लाख ३४ हजार
सावंतवाडी४२ हजार ८३ हजार
दोडामार्ग१७ लाख ९१ हजार
ओरस१६ लाख ७३ हजार
देवगड४५ लाख १५ हजार
कणकवली६९ लाख ७६ हजार
मालवण३० लाख ३७ हजार
वैभववाडी२५ लाख ६१ हजार
आचरा२३ लाख ९४ हजार
वसुलीचे प्रमाण चांगले राखण्यावर भर देण्याची परंपरा.
स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र सुटीतही सुरू ठेवल्याने चांगला परिणाम शक्य.
पुढील काळात वीज वितरण कंपनीकडून कठोर शिस्तीची अंमलबजावणी शक्य.
कोकणातील बहुतांश मंडळी परजिल्ह्यात नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक असली तरी गणेशोत्सवासाठी बहुधा गावाकडे येतात. दरमहा वसुलीचे प्रमाण चांगले आहे. परंतु परगावी राहणाऱ्या ग्राहकांची थकबाकी शिल्लक राहाते. सुटीला येणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणचे स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र २४ तास सुरू आहे. तसेच शासकीय सुट्यावगळता अन्य केंद्रांवर वीजबिल भरले जाते. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरून थकबाकी कमी होईल, शिवाय ग्राहकांवरची कारवाई टळेल.
- एस. पी. नागटिळक,
मुख्य अभियंता, कोकण परिमंडल