डब्यात उंदीर आला, पकडून द्या...

By admin | Published: October 8, 2015 05:19 AM2015-10-08T05:19:16+5:302015-10-08T05:19:16+5:30

डब्यात उंदीर आला, पकडून द्या तसेच महिला डब्यात साप शिरला बाहेर काढा, यासारख्या कारणांमुळे मध्य रेल्वेला मागील नऊ महिन्यांत मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Rats got in the car, grab it ... | डब्यात उंदीर आला, पकडून द्या...

डब्यात उंदीर आला, पकडून द्या...

Next

मुंबई : डब्यात उंदीर आला, पकडून द्या तसेच महिला डब्यात साप शिरला बाहेर काढा, यासारख्या कारणांमुळे मध्य रेल्वेला मागील नऊ महिन्यांत मनस्ताप सहन करावा लागला आहे. यासह अनेक कारणांसाठी प्रवाशांकडून ट्रेनच्या डब्यातील साखळी (चेन) खेचण्यात आली असून त्यामुळे तब्बल ९१२ लोकल आणि मेल-एक्सप्रेसचा वक्तशीरपणा बिघडल्याचे मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) सांगण्यात आले.
एखादा आपत्कालिन प्रसंग ओढवल्यास लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांसाठी साखळी उपलब्ध करण्यात आली आहे. पण ही साखळी प्रवाशांकडून विनाकारण ओढली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला त्याचा मोठा मनस्ताप होत असून लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागतो. मध्य रेल्वेवरील दादर, कुर्ला, ठाणे तसेच कसारा, कल्याण-कर्जत विभागात साखळी खेचण्याच्या घटना बऱ्याच घडत असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. २0१५ च्या जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ९२३ घटना साखळी खेचण्याच्या घडल्या असून यात १ हजार ३२७ जणांना पकडण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. एप्रिल, मे, जून,जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. लोकलमधील अपंगाच्या डब्यात उंदीर किंवा महिला डब्यात साप शिरल्यामुळे प्रवाशांकडून साखळी खेचण्यात आली आहे. तर ट्रेनमधून मोबाईल पडल्याने किंवा डब्यात मित्र न आल्यानेही प्रवाशांकडून साखळी खेचण्यात आली आहे.



२0१५ मध्ये घडलेल्या घटना
महिनाकेसेसअटक प्रवासीलेट ट्रेन
जानेवारी७१४३७१
फेब्रुवारी७३४८७१
मार्च७२५२७0
एप्रिल११३१४१११३
मे८७२३१८७
जून१0१२१९१0१
जुलै१२९३0५१२९
आॅगस्ट११५१६२११५
सप्टेंबर१६२१२६१५५

२0१५ च्या जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ९२३ घटना साखळी खेचण्याच्या घडल्या असून यात १ हजार ३२७ जणांना पकडण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Rats got in the car, grab it ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.