Join us  

Bachhu Kadu: "रवी राणांनी मला कापावं, पाहिजे ते तुकडे न्यावेत"; बच्चू कडूंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 2:53 PM

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं.

मुंबई - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. तरीही, राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनीही दम भरला. त्यानंतर, बोलताना आमदार कडू यांनी माध्यमांनाही आवाहन केलं आहे. तसेच, रवि राणांनी तलवार घेऊन यावं अन् मला कापावं, असेही कडूंनी शांतपणे म्हटले. 

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. आमच्याकडून हा वाद नाही थांबला, तर मीडियाने थांबवलं पाहिजे. मीडियाने चांगले विषय घ्यावेत, असेही कडू यांनी म्हटले. मी राणांचे आभार मानले, ते दोन पावलं मागे येत असतील तर मी ४ पाऊलं मागे येईल, असेही मी सभेत बोललो. मी आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहे. माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाला सुप्रिमा दिली. त्यामुळे, मतदारसंघातील २० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानायला जात आहे, असेही कडू यांनी म्हटले. 

राणा हा विषय नॉर्मल आहे, मी काही चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मीही आभार मानले, आता हा विषय संपल्याचे कडू यांनी म्हटले. त्यानंतर, राणा यांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलताना, ते म्हणाले मी फूल घेऊन येतो, मी म्हणतो त्यांनी तलवार घेऊन यावे. ५ आणि ६ तारखेला मी घरीच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे माझे, हात पाहिजे की पाय. माझं मुंडकं पाहिजे असेल तर तिथं कापावं मला, अशा शब्दात कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

मला दम देत असाल तर घरात घुसून मारण्याची धमकी रवी राणांनी दिली. त्यानंतर कडू यांनी ५ तारखेला मी घरात आहे. ज्याला घरी यायचं आहे त्यांनी यावं, आम्ही तयार आहोत अशा शब्दात रवी राणांवर पलटवार केला आहे. त्यामुळे राणा-कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाला असून याबाबत आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

काय म्हणाले होते रवी राणा?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे बच्चू कडू यांच्यासोबतचा वाद मिटला आहे. पण लक्षात घ्या, कुणी मला दम देत असेल तर रवी राणाने उद्धव ठाकरेंचाही दम खाल्ला नाही. बच्चू कडू काहीच नाही. जर कडू दम देत बोलत असेल तर कुठल्याही स्तरावर मी उत्तर देईन. तो ज्या स्तरावर बोलेल त्यावर उत्तर देईन. प्रेमाच्या भाषेपुढे रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेल. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायचीही हिंमत आहे असा इशारा आमदार रवी राणांनी दिला होता.  

त्याचसोबत मंत्री बनणं हा माझा अधिकार नाही. माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान ठेवत मी २ पाऊलं मागे आलो. दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यात कुणाचेही मन दुखायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. पण वारंवार मला कुणी दम देत असेल मी रवी राणाला माफ करणार नाही म्हटलं. तुला कुणी सांगितले माफ करायला? तुझ्यात जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो पाहा. वेळ सांगेल बच्चू कडू पुन्हा आमदार निवडून येतो की नाही असंही रवी राणांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :बच्चू कडूमुंबईरवी राणा