केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र भाकर यांनी स्वीकारला कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 07:06 PM2020-06-30T19:06:12+5:302020-06-30T19:07:50+5:30

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेसच्या 1999 च्या तुकडीचे अधिकारी रवींद्र भाकर यांनी मंगळवारी स्वीकारला.

Ravindra Bhakar has accepted the post of Chief Executive Officer of the Central Board of Film Certification | केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र भाकर यांनी स्वीकारला कार्यभार

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रवींद्र भाकर यांनी स्वीकारला कार्यभार

googlenewsNext

 

मुंबई : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेसच्या 1999 च्या तुकडीचे अधिकारी रवींद्र भाकर यांनी मंगळवारी स्वीकारला. यापूर्वी भाकर पश्चिम रेल्वेचे सचिव आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी भाकर यांचे स्वागत केले आहे. 

जयपूर येथून रवींद्र भाकर यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी म्हणून भाकर यांना चांगला अनुभव आहे. भारतीय रेल्वेमध्ये त्यांनी विविध महत्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांना उत्कृष्ट कामगिरीचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये रेल्वे मंत्र्यांचा राष्ट्रीय पुरस्कार आणि पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या सेवेत असताना ‘अनुकरणीय सेवा प्रदानकर्ता अधिकारी’ म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये  विविध कामांच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेत भाकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आधुनिक जनसंपर्क तंत्र विकसित केले. ई-खरेदी प्रक्रियेची अंमलबजावणी केली. विविध बहुविध तर्कसंगत योजना तयार करून त्यांची सांगड वाहतूक व्यवस्थापनाशी घालून अंमलबजावणी करण्याचे कार्य भाकर यांनी केले.

--------------------------

भारतीय रेल्वे वाहतूक सेवेमधील वरिष्ठ अधिकारी सचिन शर्मा यांची पश्चिम रेल्वेचे महाव्यपस्थापक यांचे सचिव पदावर निवड झाली आहे.

--------------------------

Web Title: Ravindra Bhakar has accepted the post of Chief Executive Officer of the Central Board of Film Certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.