Join us

शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविंद्र वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 3, 2024 18:02 IST

Maharashtra lok sabha election 2024 : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज वांद्रे पूर्व येथील  उपनगर जिल्हाधिकारी निवडणुक कार्यालयात दाखल केला.

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज वांद्रे पूर्व येथील  उपनगर जिल्हाधिकारी निवडणुक कार्यालयात दाखल केला. यावेळी म्हाडा गेट नंबर दोन येथून भव्य रॅली काढण्यात आली यात कोळी बांधव ही उपस्थित होते. महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य शिंदे सेनेचे शिवसैनिक व महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या जनसागरात ही रॅली पार पडली.

यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ॲड. आशिष शेलार, खासदार गजानन किर्तीकर, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, आमदार विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, आमदार डॉ.भारती लव्हेकर, आमदार राजहंस सिंह, आमदार दिलीप लांडे, शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, सचिव सिद्धेश कदम, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, योगेश परुळेकर, माजी नगरसेवक सदानंद परब, माजी स्वप्नील टेंबवलकर, माजी नगरसेविका रेखा रामवंशी तसेच वर्सोवा, अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील महायुतीतील विविध पक्षांतील नेते, महिला व पुरूष पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईरवींद्र वायकरशिवसेना