Join us  

आरबीएस बँकेच्या सीईओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By admin | Published: February 22, 2016 2:22 AM

बँकेच्या सीईओकडून त्याच बँकेतील उच्चपदस्थ ३०वर्षीय महिला अधिकाऱ्याला अश्लील एसएमएस पाठवण्यात आले. पुढे त्याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे कुर्ला

मुंबई : बँकेच्या सीईओकडून त्याच बँकेतील उच्चपदस्थ ३०वर्षीय महिला अधिकाऱ्याला अश्लील एसएमएस पाठवण्यात आले. पुढे त्याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे कुर्ला संकुलात घडली. या प्रकरणी ‘द रॉयल बँक आॅफ स्कॉटलंड’चे सीईओ जय बिंदर यांच्याविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार असलेल्या ‘द रॉयल बँक आॅफ स्कॉटलंड’ची वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात शाखा आहे. गेल्या पाच वर्षांपासून तक्रारदार महिला या ठिकाणी व्यवस्थापकीय मंडळावर उच्चपदस्थ अधिकारी आहे. याच शाखेत जयबिंदर सीईओ पदावर आहेत. जयबिंदर यांच्याकडून अश्लील एसएमएस पाठविले जात होते; तसेच आपल्यावर शरीरिक अत्याचार केले जात होते, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. वरिष्ठ अधिकारी असल्याने नोकरी जाण्याच्या भीतीने ती निमुटपणे हे अत्याचार सहन करत होती. मात्र जयबिंदरच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून तिने थेट बीकेसी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.सीईओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक निगाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)