मुंबई विद्यापीठाच्या अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत सामावून घ्या; गजानन कीर्तिकर यांनी घेतली राज्‍यपालांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: April 24, 2023 06:11 PM2023-04-24T18:11:57+5:302023-04-24T18:15:04+5:30

या विद्यापिठ कर्मचा-यांनी आपली व्‍यथा खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन मांडली

re absorb the temporary employees of the university of mumbai gajanan Kirtikar meet the governor | मुंबई विद्यापीठाच्या अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत सामावून घ्या; गजानन कीर्तिकर यांनी घेतली राज्‍यपालांची भेट

मुंबई विद्यापीठाच्या अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत सामावून घ्या; गजानन कीर्तिकर यांनी घेतली राज्‍यपालांची भेट

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठ आस्‍थापनेत एकूण ११०० अस्‍थायी कर्मचारी कार्यरत आहेत, त्‍यापैकी २५० कर्मचा-यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती न देता दि. १ सप्‍टेंबर २०२२ पासून तोंडी निर्देश देऊन नोकरीतून कमी करण्‍यात आले. विद्यापिठ प्रशासनाने सदर कार्यवाही चालू केल्‍यानंतर सुमारे १०८ कर्मचा-यांनी एकजूट करून औद्योगिक न्‍यायालय, वांद्रे येथे दावा दाखल केला असता, प्रथम सुनावणीत  न्‍यायालयाने स्‍थगितीचे आदेश दिले.

तर दुस-या सुनावणीत या १०८ अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत रूजू करण्‍याचे तसेच दि. १ सप्‍टेंबर २०२२ पासून आजमितीपर्यंतचे वेतन अदा करावे असे आदेश दि. १६ नोव्‍हेंबर २०२२ रोजी दिले. परंतू विद्यापिठ प्रशासनाने  न्‍यायालयाच्‍या या आदेशाची कोणतीही दखल न घेता, या   कर्मचा-यांना नोकरीत रूजू करून घेतले नाही. सदर कर्मचारी हे अल्‍प उत्‍पन्‍न गटातील असून अचानक उद्भवलेल्‍या बेरोजगारीमुळे त्‍यांचे कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. 

या विद्यापिठ कर्मचा-यांनी आपली व्‍यथा खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन मांडली, या कर्मचा-यांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी त्यांनी महाराष्‍ट्राचे  राज्‍यपाल महोदय रमेश बैस यांची आज कर्मचा-यांचे शिष्‍टमंडळासह भेट घेऊन निवेदन सादर केले. याप्रकरणी राज्‍यपाल महोदयांनी या कर्मचा-यांना पुन्‍हा सेवेत सामा‍वून घेण्‍यासाठी सकारात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले. 

याप्रसंगी स्‍थानिक शिवसेना पदाधिकारी वैभव भरडकर व कर्मचारी प्रतिनिधी गोपाळ सुतार,  संतोष नेपाळे, भागिरथी कांबळे, दत्‍तात्रय तेली आदी उपस्थित होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: re absorb the temporary employees of the university of mumbai gajanan Kirtikar meet the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.