राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा पुन्हा उच्चांक; दिवसभरात आढळले २७ हजारांहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:17+5:302021-03-21T04:07:17+5:30

मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सलग दोन दिवस काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक ...

Re-emergence of daily patient population in the state; More than 27,000 patients were found during the day | राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा पुन्हा उच्चांक; दिवसभरात आढळले २७ हजारांहून अधिक रुग्ण

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा पुन्हा उच्चांक; दिवसभरात आढळले २७ हजारांहून अधिक रुग्ण

googlenewsNext

मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सलग दोन दिवस काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ९२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ९१ हजार ६ इतकी झाली आहे. राज्यात लॉकडाऊन होऊन वर्षपूर्ती होत असताना कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारी २,९६२ रुग्णांची नाेंद झाली असून, ७ मृत्यू झाले.

राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २४,४९,१४७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ३०० आहे. शनिवारी दिवसभरात १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २२,०३,५५३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

* सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात

पुण्यात सर्वाधिक ३८ हजार ८०३ एवढे उपचाराधीन रुग्ण आहेत. त्याखालाेखाल नागपूर २८ हजार ४०३, मुंबई २० हजार १९, ठाणे १८ हजार ८८, नाशिक १३ हजार २२३, तर औरंगाबाद १३ हजार ७ अशी उपचाराधीन रुग्णांची संख्या आहे.

* राज्यातील काेराेना रुग्णसंख्या

२० मार्च २७ हजार १२६

१९ मार्च २५ हजार ६८१

१८ मार्च २५ हजार ८८३

१७ मार्च २३ हजार १७९

Web Title: Re-emergence of daily patient population in the state; More than 27,000 patients were found during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.