Join us

मुंबईत कुठेही एका तासात पोहोचणार: मुख्यमंत्री शिंदे, कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:36 AM

दहिसर-पालघरपर्यंत विस्तारणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. कोस्टल रोड प्रकल्प हा याच धोरणाचा भाग असून मुंबई महापालिकेने विकसित केलेला हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केले. अटल सेतू, कोस्टल रोड यांसह इतर प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत कुठेही एक तासात पोहोचता येईल. हा रस्ता पुढे टप्याटप्याने दहिसर आणि पालघरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राइव्ह या दक्षिणवाहिनी मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी उ‌द्घाटन उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला असून पुढील टप्पा मेपर्यंत सुरू होईल. कोळी बांधवांच्या मागणीनुसार या रस्त्यांच्या खांबांमधील अंतर १२० मीटरपर्यंत वाढवून त्यांना न्याय दिला आहे. याशिवाय प्रियदर्शनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३०० एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून, मुंबईकरांसाठी हे ऑक्सिजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजपासून कोस्टल रोड होणार सुरू

- सोमवार ते शुक्रवार, रोज सकाळी ८ ते रात्री ८ वेग मर्यादा (प्रति तास)- सरळ मार्गावर - ८० किमी- बोगद्यामध्ये - ६० किमी- वळणाच्या तसेच प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी - ४० किमी

प्रवेशबंदी असलेली वाहने

- सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, जड मालवाहने (बेस्ट/एसटी बसेस/प्रवासी वाहतूक करणारी वाहनेवगळून) आणि सर्व मालवाहू वाहने.- सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तीच्या मोटारसायकल/स्कूटर (साइड कारसह)- सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, पादचारी

 

टॅग्स :एकनाथ शिंदे