विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:16 AM2023-09-03T11:16:22+5:302023-09-03T11:16:29+5:30

दरम्यान, रहिवाशांना भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागत होता.

Reach Bhandup Station now without obstacles; Bulldozers on 40-year-old structures for road widening | विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

विनाअडथळा गाठा आता भांडुप स्टेशन; रस्ता रुंदीकरणासाठी ४० वर्षे जुन्या बांधकामांवर बुलडोझर

googlenewsNext

मुंबई : पालिका क्षेत्रातील भांडुपच्या भट्टीपाडा जंक्शन चौकातील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ६४ बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली. भट्टीपाडा जंक्शन येथील खोत मार्ग, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग आणि भट्टीपाडा मार्ग एकत्र येऊन तयार होणाऱ्या चौकासाठी ही बांधकामे अडसर ठरत होती. ही तब्बल ४० वर्षे जुनी बांधकामे पाडल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, रहिवाशांना भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागत होता. भांडुपमध्ये भट्टीपाडा जंक्शन येथील अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. या चौकाच्या रुंदीकरणाचे काम एस विभागामार्फत हाती घेतले होते. गुरुवारी उपायुक्त देवीदास क्षीरसागर,  सहायक आयुक्त महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

वृक्षांची केली छाटणी
  भट्टीपाडा जंक्शन चौक रुंदीकरणामुळे टेंबीपाडा, गावदेवी, ॲन्थोनी चर्च, छत्रपती शिवाजी महाराज तलाव या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. 
  ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील गावदेवी नाला रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणीही केली.

अभियंता पथकासह अधिकारी, कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. 
कारवाईसाठी १ पोकलेन, ३ जेसीबी, ६ डम्पर, १० अधिकारी आणि ४९ कामगार तैनात होते. तसेच भांडुप पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त होता. 

Web Title: Reach Bhandup Station now without obstacles; Bulldozers on 40-year-old structures for road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.