प्रवास करण्याआधी कोरोना नियमावली वाचून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:06 AM2021-04-18T04:06:27+5:302021-04-18T04:06:27+5:30

विमान कंपन्यांचा प्रवाशांना सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे बऱ्याच राज्यात कठोर निर्बंध लागू ...

Read the Corona Rules before traveling | प्रवास करण्याआधी कोरोना नियमावली वाचून घ्या

प्रवास करण्याआधी कोरोना नियमावली वाचून घ्या

Next

विमान कंपन्यांचा प्रवाशांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे बऱ्याच राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास करण्याआधी आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने लागू केलेली कोरोना नियमावली वाचून घ्या, असा सल्ला विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिला.

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नईसह देशातील बहुतांश विमानतळावरून ये-जा करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. त्याची वैधता ७२ तास इतकी आहे. वैध अहवाल नसतानाही प्रवास केल्यास ७ ते १४ दिवस विलगीकरणात राहण्याची सक्ती केली जात आहे. शिवाय कोरोना अहवालात फेरफार केल्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याने दिल्ली सारख्या विमानतळावर रॅण्डम चाचणी केली जात आहे. या चाचणीदरम्यान एखादा प्रवासी बाधित आढळल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी, तर दिल्लीमध्ये विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रवास करण्याआधी प्रवाशांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने लागू केलेली नियमावली वाचून घ्यावी, अन्यथा आपल्या इच्छीत स्थानापर्यंत पोहोचण्यात अडथळे येऊ शकतात, असे विमान कंपन्यांनी निवेदनात म्हटले आहे.

.............................

Web Title: Read the Corona Rules before traveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.