‘न्यूनगंड बाजूला सारत वाचन करावे’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:55 AM2021-02-01T02:55:23+5:302021-02-01T02:55:42+5:30

Marathi News : जोपर्यंत संस्कृती आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे. 

‘Reading on the side of inferiority’ | ‘न्यूनगंड बाजूला सारत वाचन करावे’

‘न्यूनगंड बाजूला सारत वाचन करावे’

googlenewsNext

मुंबई :  जोपर्यंत संस्कृती आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारत भरपूर वाचन करावे. 
दर्जेदार नाटक व चित्रपट पहावेत. आपली भाषा जपविणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे ज्येष्ठ चित्रकार व साहित्यिक सुभाष अवचट म्हणाले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप नुकताच पार पडला. यावेळी सुभाष अवचट बोलत होते. 
ते म्हणाले की, मराठीतील कला, संस्कृती आणि साहित्य अतुलनीय आहे. कोणालाही आज किंवा भविष्यात तिच्या अस्तित्वाची चिंता करण्याची गरज नाही.  

 पुरस्कारप्राप्त विजेत्यांची नावे 

निबंध  

१) सूरदास भोसले 
२) मयूर कदम 
३) ज्योती नायर 

अभिवाचन
१) मयूर कदम 
२) ज्योति नायर 
३) नीती तामसे 

कविता
१) नभा शिरोडकर २) ज्योती नायर 
३) कुशल नेहेते ४) रूपेश वानखेडे 

प्रश्नमंजुषा 
१) प्रशांत शिंदे 
२) रूपेश वानखेडे 
३) भारत कांबळे 
४) महेश कुमार 

Web Title: ‘Reading on the side of inferiority’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.