नोंदणीकडे फेरीवाल्यांची पाठ
By admin | Published: November 11, 2014 11:05 PM2014-11-11T23:05:47+5:302014-11-11T23:05:47+5:30
फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी जून महिन्यापासून प्रभाग समितीनिहाय मोहीम पालिकेने हाती घेतली होती.
Next
ठाणो : फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी जून महिन्यापासून प्रभाग समितीनिहाय मोहीम पालिकेने हाती घेतली होती. सुरुवातीपासून अपयशी ठरलेल्या या मोहिमेकडे फेरीवाल्यांनीच आता पाठ फिरविल्याचे उघड झाले आहे. मागील सहा महिन्यांत केवळ 7114 फेरीवाल्यांनीच नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे की, 15 दिवसांतून एक अथवा दोनच अर्ज प्राप्त होत असल्याने या मोहिमेला हरताळ फासला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने मुख्य समिती स्थापन करून जून महिन्यापासून फेरीवाला नोंदणीला सुरुवात केली होती. यासाठी 5क् हजार अर्ज छापले होते. त्यानुसार, नोंदणीसाठी 3क् जून ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु, या कालावधीत केवळ 2214 जणांनीच अर्ज केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, आयुक्त असीम गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली. परंतु, या महिन्यात नोंदणी झाली नाही तर ऑगस्टपासून फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आदेश संबंधित विभागाला दिले होते. परंतु, तरीदेखील जुलैमध्ये सुमारे 4 हजारच फेरीवाल्यांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांना तारीख वाढवून यानंतर नोंदणी न केल्यास कारवाई करण्याचे फर्मान पालिकेने काढले होते.
परंतु, फेरीवाल्यांना तारीख पे तारीख देऊनही त्यांनी नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे पालिकेने आता मान्य केले आहे. सहा महिन्यांनंतरही पालिकेला त्यांची नोंदणी करण्यात यश आलेले नाही. सहा महिन्यांत केवळ 7114 फेरीवाल्यांनीच नोंदणी केल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली. यापूर्वीसुद्धा पालिकेने फेरीवाल्यांसाठी योजना पुढे आणल्या होत्या. त्या आजही कागदावरच आहेत. त्यामुळे ही योजनादेखील कागदावर राहील, असा समज फेरीवाल्यांमध्ये आहे. त्यात कारवाई करण्याचा फार्स पालिकेकडून केला जात असला तरी कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांनासुद्धा पालिकेच्या कारवाईची भीती राहिलेली नाही.
त्यामुळे आता गेल्या दोन महिन्यांपासून 15 दिवसांतून एक ते दोनच फेरीवाले अर्ज सादर करीत असल्याचेही पालिकेने सांगितले. परंतु, पालिकेच्या या पोकळ धमक्यांना आता फेरीवाल्यांनी केराची टोपली दाखविली आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग समितीवितरीत अर्ज नोंदणी
नौपाडा1682 1316
कोपरी31क् 214
कळवा1389 1क्51
रायलादेवी857 559
वागळे92क् 613
मुंब्रा1548 968
उथळसर977 754
माजिवडा-मानपाडा982 638
वर्तकनगर1272 1क्क्1
एकूण9937 7114