छाबड हाउस स्वागतासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:21 AM2018-01-17T04:21:20+5:302018-01-17T04:21:29+5:30
कुलाब्यातील नरिमन हाउस छाबड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू गुरुवारी, १९ जानेवारीला या ठिकाणी भेट देणार आहेत
चेतन ननावरे
मुंबई : कुलाब्यातील नरिमन हाउस छाबड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू गुरुवारी, १९ जानेवारीला या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्याआधी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी २६/११ हल्ल्यात बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग मंगळवारी छाबड हाउसमध्ये दाखल झाला आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला असून स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.
मोशे या चिमुरड्याच्या आगमनानंतर छाबड हाउसला चैतन्य आले आहे. येथील व्यवस्थापनाने त्याच्या आगमनाचा आनंदही व्यक्त केला. २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये छाबड हाउससमोरील नेक्स बेकरीवरही तुफान गोळीबार झाला होता. छाबड हाऊसच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गोळीबाराची आठवण म्हणून बेकरी मालकाने बेकरीच्या भिंतीवरील गोळ्यांचे ठसे रंगरंगोटी करूनही तसेच ठेवले आहेत. शिवाय त्या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचा संदेशही मालकाने भिंतीवर लिहिला आहे.
उद्या अधिकृत घोषणा : हे संग्रहालय ज्यू लोकांसह सर्वधर्मीयांसाठी खुले करण्यात येणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत भेटीवर असून गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत या स्मारकाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
मोशेचा दौरा
मोशेच्या आई-वडिलांशी संबंधित अनेक वस्तू मुंबईत असून, त्याची माहिती तो या दौºयात घेणार आहे. मुंबई दौºयामध्ये तो ताज आणि गेट वे आॅफ इंडियाला भेट देणार आहे.
इतिहास काय सांगतो?
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या नरिमन हाउसच्या छाबड सेंटरचाही समावेश होता.दहशतवाद्यांनी या इमारतीत घुसून सहा रहिवाशांचा बळी घेतला होता, या हल्ल्यात इमारतीचेही
मोठ्या प्रमाणात नुकसान आणि पडझड झाली होती.दहशतवादी हल्ल्यात ‘मोशे’
या दोन वर्षांच्या लहान मुलाला वाचविण्यात आले होते. मात्र त्याचे आईवडील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले.हे दोघेही
मुंबई आणि परिसरातील ज्यू नागरिकांबाबत अभ्यासासाठी
2003
मध्ये मुंबईत आले होते.
हल्ल्यात वाचलेल्या छोट्या मोशेला त्याचे आजी-आजोबा इस्रायलला घेऊन गेले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी डागडुजी करून छाबाड सेंटरची इमारत उभी करून पूर्ववत सुरू करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल भेटीदरम्यान मोशे व त्याच्या कुटुंबाला दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री व्हिसा दिला होता.
‘त्या’ स्मृतींना नव्याने उजाळा
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात
वाचलेल्या छोट्या मोशेला त्याचे आजी-आजोबा इस्रायलला घेऊन गेले होते. या हल्ल्याच्या आठवणी त्यांच्या मनावर खोलवर रुतल्या आहेत. त्यानंतर
आता तब्बल सहा वर्षांनी मोशेसह ते येथे आले आहेत. त्यामुळे हल्ल्यातील
त्या स्मृतींना नव्याने उजाळा मिळाला आहे.