गणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज
By admin | Published: September 26, 2015 03:24 AM2015-09-26T03:24:12+5:302015-09-26T03:24:12+5:30
उद्या अनंत चतुर्दशीदिनी गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून,
मुंबई : उद्या अनंत चतुर्दशीदिनी गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, महापालिका विसर्जनासाठी सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या तयारीच्या दृष्टीने विविध खात्यांमध्ये समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीचा सराव गिरगाव चौपाटी येथे आयोजित करण्यात आला होता; त्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त अजय मेहता म्हणाले, विसर्जनाच्या दृष्टीने कुठल्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सर्व यंत्रणांच्या समन्वयातून तत्परतेने काम करत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे तेवढेच महत्त्वपूर्ण असून गणेश विसर्जन सुरक्षितपणे कसे होईल याला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक मंडळाने आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन लवकर करून इतर मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे सत्र प्रमुख लोखंडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. (प्रतिनिधी)
-------
रेल्वेचा मेगाब्लॉक नाही
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शनिवारी २६ सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर वान्द्रे टर्मिनस आणि यार्डात मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
प.रे. आणि म.रे.वर मध्यरात्री विशेष गाड्या
विसर्जनानंतर मध्यरात्री उशिरा घरापर्यंत पोहोचणाऱ्या भक्तांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटहून मध्यरात्री सव्वा एक वाजता, त्यानंतर १.५५ वाजता, २.२५ वाजता आणि ३.२0 वाजता विरारसाठी लोकल सुटतील. मध्य रेल्वेवर सीएसटीहून मध्यरात्री दीड वाजता कल्याणसाठी लोकल सोडली जाणार आहे. ही लोकल प्रत्येक स्टेशनवर थांबणार असून कल्याण येथे मध्यरात्री ३ वाजता ती पोहोचेल.
--------
वाहतुकीसाठी ४९ रस्ते बंद असून यातील दक्षिण मुंबईतील काही महत्त्वाचे रस्ते
कुलाबा
च्नाथालाल पारेख मार्ग- बधवार पार्क जंक्शन ते इंदू क्लिनिकपर्यंत
पायधुनी
च्जिनाभाई मुलजु राठोड मार्ग- शिवदास चापसी मार्ग जक्शन ते पी.डिमेलो मार्ग जक्शनपर्यंत.
काळबादेवी
जे.एस.एस. रोड- प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत
व्ही.पी. रोड- सीपी टँक सर्कल ते भालचंद्र कंपनीपर्यंत.
बी.जे. रोड- जे.एस.एस. रोड ते एम.के. रोडपर्यंत.
आर.आर. रोड- चर्नी रोड स्टेशन ते पोर्तुगीज चर्च ते प्रार्थना समाजपर्यंत.
सी.पी. टँक रोड- माधवबाग ते सी.पी. टँक सर्कलपर्यंत
दुसरा कुंभारवाडा रोड
संत सेना मार्ग
दुसरी सुतार गल्ली
नानुभाई देसाई रोडमलबार हिल
वठ्ठलभाई पटेल मार्ग हा कावसजी पटेल टँकपासून ते सरदार वल्लभभाई पटेल जंक्शन आणि तो मार्ग डॉ. भडकमकर मार्गास जेथे मिळतो.
जगन्नाथ शंकर शेट मार्ग (गिरगाव रोड) हा प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शनपासून एस.व्ही.पी. मार्ग जंक्शनपर्यंत.
सरदार वल्लभाई पटेल मार्ग (सॅन्डहर्स्ट रोड) - सरदार वल्लभभाई पटेल मार्ग हा डॉ.एन.ए. पुरंदरे मार्ग (मरिन ड्राइव्ह) जंक्शनपासून पंडित पलुस्कर चौक (आॅपेरा हाऊस) आणि तसा पुढे राजाराम मोहन रॉय मार्गापर्यंत वाहतुकीस बंद राहील.
सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील वाडीबंदर पूल पश्चिमेकडून पूर्वेस जाण्यास वाहतुकीस बंद राहील.
ताडदेव
पंडिता रमाबाई मार्ग हा एन.ए. पुरंदरे मार्ग जंक्शन ते न्या. सीताराम पाटकर मार्गपर्यंत बंद राहील.
भायखळा
डॉ. बी.एस. रोड भारतमाता ते बावला कंपाउंड दोन्ही बाजूस बंद राहील.
डॉ. एस.एस. रोड गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी.
दत्ताराम लाड मार्ग चिंचपोकळी ब्रिजपासून ते श्रावण यशवंते चौक, काळाचौकी दोन्ही बाजूस बंद राहील.
साने गुरुजी मार्ग हा संत जगनाडे चौक आणि गॅस कंपनी जंक्शन ते आर्थर रोड नाका.
------------
पूर्व तसेच पश्चिम उपनगरातील हे रस्ते बंद असतील
दादर
रानडे मार्ग हा एन.सी. केळकर मार्गास जेथे मिळतो तिथपासून ते वीर सावरकर मार्गाला मिळतो तिथपर्यंत व तेथून चैत्यभूमीपर्यंत वाहनांसाठी बंद राहील.
शिवाजी पार्क पथ क्रमांक ३ - गोखले पार्क (उत्तर) जंक्शनपासून रानडे मार्ग जंक्शनपर्यंत.
शिवाजी पार्क पथ क्रमांक ४ हा मार्ग गोखले मार्ग (उत्तर) जंक्शनपासून शिवाजी पार्क पथ क्रमांक ३ पर्यंत.
केळूसकर मार्ग हा गोखले मार्ग (उत्तर) ते केळूसकर मार्ग जंक्शनपर्यंत.
केळूसकर मार्ग (दक्षिण)- हा वीर सावरकर मार्ग जंक्शन ते केळूसकर मार्ग जंक्शनपर्यंत.
केळूसकर मार्ग (उत्तर) हा वीर सावरकर मार्ग जंक्शन ते केळूसकर मार्ग जंक्शनपर्यंत.
एन.सी.केळकर मार्ग कबुतरखान्यापासून एल.जे.रोड ते गडकरी चौकापर्यंत.
एम.बी.राऊत मार्ग हा एसव्ही एस मार्ग आणि शिवाजी पार्क पथ क्रमांक दोनपर्यंत.
मुलुंड
भट्टीपाडा मार्ग, भांडुप पश्चिम- भट्टीपाडा मार्ग लाल बहादूर शास्त्री मार्ग जक्शनपासून जंगल मंगल मार्ग जक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतूकीस बंद राहिल.
मंगल मार्ग, भांडुप पश्चिम हा लक्ष्मी हॉटेल व सर्वोदय नगर पर्यंतचा भाग सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतूकीस बंद राहिल.
पंडीत दिनदयाल उपाध्याय मार्ग (डंपींग रोड), मुलुंड पश्चिम हा मार्ग लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मॉडेला जक्शनपासून आंबेडकर चौकापर्यंत सर्व वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतूकीस बंद राहिल.
लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड प हा उत्तर वाहीनीच्या मॉडेला लाईट सिग्नल जक्शनपासून टोल नाक्यापर्यंत भाग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंद राहिल.
माटुंगा
टिळक ब्रिज हा खोदादाद सर्कल ते कोतलाव गार्डनपर्यंत, दोन्ही बाजूंनी वाहतुकीस बंद राहील.
घाटकोपर
लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला पश्चिम- लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या उत्तर वाहिनीच्या कुर्ला डेपो जक्शनपासून ते घाटकोपर लिंक राडे जक्शनपर्यंत उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंद राहिल.
----
सांताक्रूझ
लिंकिंग रोड हा सांताक्रूझ पोलीस ठाणे जंक्शनपासून पुढे खार टेलिफोट एक्स्चेंज जंक्शनपर्यंत दक्षिण वाहनीवरील वाहतुकीस बंद.
टागोर रोड हा देवदीप इमारतीपासून पुढे दक्षिणेस जुहू रोडपर्यंत प्रवेश बंद राहील. तसेच जुहू रोड सोसायटी स्टोअर येथे डावीकडे प्रवेश बंद राहील.
जुहू रोड - सांताक्रूझ पोलीस ठाणे येथे लिकिंग रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता प्रवेश बंद राहील. गझरबांध जंक्शन या ठिकाणी गझरबांध रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता प्रवेश बंद राहील.
------
कोळी बांधवांची भाविकांवर देखरेख
मुंबई : दादर येथील किर्ती कॉलेज, प्रभादेवी, नरीमन भाटनगर आणि वरळी कोळीवाडा किल्ला परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीतर्फे अध्यक्ष हरिश्चंद्र नाखवा, रमाकांत पाटील, कृष्णा चंदू, विलास वरळीकर, मायकल कोळी, हेमंत नाखवा, प्रदीप नाखवा आणि विश्वास कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे स्वयंसेवक देखरेख ठेवणार आहेत.
जुहू तारा रोड हा किशोर कुमार गांगुली जक्शन येथे या मार्गावरुन पश्चिमेस जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद- रॉय हॉटेल जक्शन येथे किशोर कुमार गांगुली मार्गावरुन पश्चिमेस जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद.
शामराव परुळेकर मार्ग हा
इंद्रवदन ओझा मार्ग जक्शन ते वैकुंठलाल मेहता मार्ग वाहतूकीस बंद राहिल.
जर्नादन म्हात्रे राोड जुहू नाक्यापासून ते मोरा गावपर्यंत.