नाताळसाठी मूर्तींचे रेडीमेड सेट
By admin | Published: November 23, 2014 11:08 PM2014-11-23T23:08:13+5:302014-11-23T23:08:13+5:30
डिसेंबर लागताच नाताळच्या आगमनाची चाहूल लागते. वसईत अगदी जल्लोषात नाताळ सण साजरा करण्याची पद्धत आहे.
Next
नायगाव : डिसेंबर लागताच नाताळच्या आगमनाची चाहूल लागते. वसईत अगदी जल्लोषात नाताळ सण साजरा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या सणाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारे येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा सादर करणारे गोठे, वसई पश्चिम पट्ट्यासह विविध भागांत याकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा, यामुळे येथील चुरस वाढत गेली.
देखाव्यांसाठी ख्रिस्त जन्मकाळातील दृश्य उभी करण्यासाठी लागणाऱ्या मूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळे कारागीर सध्या यात व्यस्त आहेत. १५०० पासून ते २५ हजार रुपयांपर्यंत अशा स्वरूपाच्या मूर्तींचे सेट बनविले जातात. मुंबईमध्येही या मूर्तींना मागणी वाढली असुन व्यवसायाची भरभराट झाली आहे.