- ओमकार गावंडमुंबई : कोरोनामुळे मागीलवर्षी बांधकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र यंदाच्या वर्षी बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे. २०२१ च्या काही महिन्यांमध्ये झालेल्या घर विक्रीने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.बांधकाम क्षेत्राला पुन्हा एकदा चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांनी सवलत दिली. सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान मुद्रांक शुल्कात देण्यात आलेल्या सवलतींचा फायदा अनेक ग्राहकांनी घेतला. ३१ मार्च ही मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याची शेवटची तारीख असल्याने मार्च महिन्यातील घरविक्रीने नवीन विक्रम प्रस्थापित केला. यामुळे सरकार दरबारी महसूलदेखील चांगला जमा झाला.कोणत्या महिन्यात किती रजिस्ट्री?बांधकाम व्यावसायिकांनी घरखरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्स ठेवल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जात आहे. तसेच नागरिकांची २ आणि ३ बीएचके घरांना जास्त पसंती मिळत आहे.घर घेणे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरसर्वसामान्यांना परवडणारी घरे मुंबईत अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. व्यावसायिक अनेक ऑफर देतात त्याचप्रमाणे गृहकर्जदेखील स्वस्त आहे. मात्र महागाईमुळे सर्व घरे बजेटच्या बाहेर जातात. त्यामुळे मुंबई सोडून बदलापूर, पनवेल, डोंबिवली येथे घर खरेदी करावे लागत आहे. - गिरीश परदेशी
मुंबईत वन बीएचके घर करोडोंमध्ये विकले जात आहे. दोन आणि तीन बीएचके घर हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. मुंबईत परवडणारी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. - अर्चना शिंगारे म्हणून वाढल्या घरांच्या किमतीप्लॉट - मागच्या वर्षापासून प्लॉटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे प्लॉट खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.सिमेंट - दोन वर्षांपूर्वी सिमेंटची एक बॅग २०० रुपयांना होती. आता कोरोनाच्या काळात सिमेंटच्या बागेची किंमत २६० रुपये झाली आहे.स्टील - दोन वर्षांपूर्वी ३६ हजार रुपये प्रतिटन असणाऱ्या स्टीलची किंमत आता ४२ हजार प्रतिटन झाली आहे. वीट - ७ रुपये प्रति नग असणाऱ्या विटा आता १२ रुपये प्रति नग मिळत आहेत.वाळू - १,५०० रुपये प्रतिटन असणारी वाळू २ हजार रुपये प्रतिटन मिळत आहे.