'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:48 PM2020-05-28T18:48:23+5:302020-05-28T18:49:12+5:30

भारतातील रिअल इस्टेट सेक्टरबाबत शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र ...

'The real estate sector is in a state of disarray; sharad pawar wrote letter to PM modi MMg | 'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'

'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'

googlenewsNext

मुंबई - रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत आहे. जवळपास तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कामगारांची कामे, रखडलेली कामे व विक्री यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होत नाहीय. या आर्थिक घडामोडीने कंबरडे मोडले असल्याने याचा परिणाम जीडीपीने जो मोठा वाटा उचलला आहे त्यावर होत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात मांडले आहे. 

दरम्यान कोरोना साथीमुळे देशभरात लॉकडाऊन दरम्यान भारतातील रिअल इस्टेट सेक्टरच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआरईडीएआय) देखील यासंदर्भात एक मुक्त पत्र लिहिले असून पंतप्रधान यांनी त्वरित हस्तक्षेप करून रिअल इस्टेट क्षेत्राला सपोर्ट करावा अशी विनंती केली आहे याचा दाखलाही शरद पवार यांनी दिला आहे. 

या विनंती पत्रात या क्षेत्राला मदत करण्यासाठी आमच्याकडे वन टाइम पुनर्रचना, अतिरिक्त संस्थागत निधी, दंडात्मक व्याज माफी आणि जीएसटी लागू होण्याकरिता परवडणार्‍या पैशाचे निकष निर्माण करण्यासाठी धोरणातील नवकल्पना यासारख्या काही शिफारसी केल्या आहेत हेही शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रीय हित म्हणून काय निर्णय घेतात आणि कृती करतात हे पहावं लागणार आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: 'The real estate sector is in a state of disarray; sharad pawar wrote letter to PM modi MMg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.