देशातील वास्तववादी मुद्दे ‘सीएए-एनआरसी’मुळे दुर्लक्षित, राष्ट्रीय चर्चासत्रात जेष्ठ विचारवंताचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 09:10 PM2020-02-09T21:10:11+5:302020-02-09T21:12:26+5:30
वास्तववादी मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी,सीआयए हे मुद्दे उपस्थित केले आहेत
मुंबई - भारत हा आशियातील भविष्यातील महाशक्ती असला तरी सध्या सर्वाधिक खराब आर्थिक संकटामुळे आपल्याला कमी महत्त्व दिले जात आहे, त्यावरुन नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी,सीआयए हे मुद्दे उपस्थित केले आहेत, असे मत देशभरातील विचारवत व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रविवारी व्यक्त केले.
‘देशासमोरील सद्याची संकटे आणि जबाबदार नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर पेट्रियॉटिक इंटिलेक्च्यूल्स आॅफ इंडिया आणि उर्दू मर्कज यांच्यावतीने त्याचे हज हाऊस मध्ये आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये जेष्ठ विचारवंत प्रा. राम पुनयानी पत्रकार एफ. डिसूजा, कुलगुरू फैजान मुस्तफा, फादर फ्रेजर मस्करन्हास व अभिनेता सुशांत सिंह यांनी केंद्राच्या धोरणावर कडाडून टीका केली.
अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार, सामाजिक तेढ, महिलांची सुरक्षितता,पोषण आणि शिक्षण हे मुद्दे जाणीवपूर्वक राजकीय पटलावर आणली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. राम पुण्यानी म्हणाले,‘ ‘सीएए-एनआरसी’ तर थेट दुही निर्माण केली आहे. मोदी सरकारची धोरणे, काळा पैसा परत आणण्यात आलेले अपयश, महागाई आणि वाढती बेरोजगारी आदी कारणे यामागे आहेत.गरीब, श्रमिक आणि शेतकरी आणि समाजातील पीडित वगार्ला त्रास देणाऱ्या नीती-धोरणांविरोधात प्रतिरोध करण्याचे शाहीन बाग हे प्रतीक झालेले आहे. आता ते केवळ भौतिक स्थान राहिलेले नाही. ’
राममंदिर, गोमांस, लव जिहाद आणि घरवापसी सारख्या भावनिक मुद्द्यांनी समाजाला विभाजित करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे यातून स्पष्ट होते. पण शाहीनबाग समाजाला पूवीप्रमाणे एकजूट करत आहे. अनेक समाजांच्या इतिहासात भारत अनुकरणीय देश राहिला आहे. हा देश मानव सभ्यतांचे पालन आणि आध्यात्मिक विचारसरणीत अग्रेसर राहिला आहे. आपण सगळे पुन्हा एकदा अद्वितीय संविधान कायम ठेवण्याचा संकल्प करूयात. भारतातील विविधता पाहता आपले संविधान सर्वाधिक प्रगतशील मानवतेचा प्रयोग आहे., असे मत अन्य वक्तांनी मांडली.