रिॲलिटी चेक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:03+5:302021-09-27T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट मुंबई महापालिकेने थोपवून लावली असली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट मुंबई महापालिकेने थोपवून लावली असली तरीदेखील नवरात्रोत्सव, दिवाळी, नाताळसारख्या सणांमुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. परिणामी तिसरी लाट येऊच नये, म्हणून मुंबई महापालिका काम करीत असून, लसीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सामाजिक अंतर पाळण्यासह मास्क घालण्याचे आणि हात धुण्याचे आवाहन मुंबई महापालिका मुंबईकरांना करीत आहे. तिसरी लाट येणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे.
काय आहे कारण ?
कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे सदर बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविडविषयक चाचणी करून घेण्याबाबत महापालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्यादेखील करीत आहे.
- कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून नियमितपणे व सातत्याने कोविडविषयक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत.
- बाहेरगावी जाऊन परतलेल्या व्यक्तींनी आवर्जून कोविड वैद्यकीय चाचणी करून घ्यावी.
- आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार चाचण्या करण्याची कार्यवाही व व्यवस्थापन सातत्याने अधिकारी प्रभावीपणे करीत आहेत.
- मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या वैद्यकीय चाचण्यांनी एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
- २१ सप्टेंबरपर्यंत एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
- कोविडचा पहिला रुग्ण मुंबईत मार्च २०२० मध्ये आढळून आला.
- तेव्हापासून आजतागायत विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत.
- उपाययोजनांमध्ये कोविडविषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.
- सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
- मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येदेखील चाचण्या करण्यात येत आहेत.
- सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे.
- २६० चाचणी केंद्रांवर कोविडविषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते.
- केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो.