ऊनपावसाच्या खेळाने आली श्रावण सरींची प्रचिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 04:17 AM2020-07-30T04:17:50+5:302020-07-30T04:17:53+5:30

कमी पाऊस : पश्चिम उपनगरात ३४.९२ मिलीमीटर पावसाची नोंद

The realization of Shravan Sari came with the game of wool rain! | ऊनपावसाच्या खेळाने आली श्रावण सरींची प्रचिती!

ऊनपावसाच्या खेळाने आली श्रावण सरींची प्रचिती!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुधवारी रंगलेल्या ऊनपावसाच्या खेळाने मुंबईकरांना श्रावण सरींची प्रचिती आली. सकाळी, दुपारी आणि सूर्यास्तापर्यंत मुंबईकरांना सातत्याने ऊनपावसाचे चित्र पाहण्यास मिळत होते. दुपारी २ ते ४ या काळात मात्र पाऊस बऱ्यापैकी विश्रांतीवर असतानाच दाटून आलेल्या ढगांनी पावसाची वर्दी दिली खरी; मात्र बरसात काही झालीच नाही.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ८९ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. २८ जुलैपर्यंत मुंबईत १ हजार ८७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ६६८ मिलीमीटर आहे. तर टक्केवारी ७३.५५ आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या आणि पश्चिम उपनगराच्या तुलनेत पूर्व उपनगरात कमी पाऊस पडत आहे. बुधवारी शहरात ८५.२, पूर्व उपनगरात १३.९८ आणि पश्चिम उपनगरात ३४.९२ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी पाऊस कोसळत असतानाच २ ठिकाणी घरांचा भाग पडला. ७ ठिकाणी झाडे कोसळली. १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात विजांचा कडकडाट होईल. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील.

Web Title: The realization of Shravan Sari came with the game of wool rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.