मनसेच्या निवडणुकीतील माघारीमागे ‘राज’कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:18 AM2019-03-19T06:18:59+5:302019-03-19T06:19:18+5:30

  यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मंगळवारी प्रथमच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

 The reason behind the reversal of MNS elections is 'Raj' | मनसेच्या निवडणुकीतील माघारीमागे ‘राज’कारण

मनसेच्या निवडणुकीतील माघारीमागे ‘राज’कारण

googlenewsNext

- गौरीशंकर घाळे
मुंबई -  यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे मंगळवारी प्रथमच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. पक्षाची भूमिका आणि आगामी वाटचालीबाबत भाष्य करतानाच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाविरोधात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
मंगळवारी वांदे्र येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आघाडीच्या संदर्भातील चर्चा, लोकसभा निवडणुकीतील मनसेचे भूमिका आणि विधानसभेच्या दृष्टीने राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर घसरलेले मनसेचे इंजिन अद्याप रूळावर आलेले नाही. २००९ साली ११ तर २०१४ साली मनसेने दहा जागांवर उमेदवार दिले होते. २०१४ ला बहुतांस ठिकाणी उमेदवारांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. आतासुद्धा लोकसभा निवडणुकीत भरीव यश मिळेल, अशी स्थिती नाही. उलट मनसेची हक्काची मते काही हजारांनी जरी घटली तरी त्याचा नकारात्मक परिणाम आगामी काळात होऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकांऐवजी विधानसभेच्या दृष्टीने बांधणी करण्याची योजना आहे.
शिवाय, मनसे प्रत्यक्ष निवडणुकीपासून लांब राहणार असली तर छोट्या सभा, मेळावे आणि पत्रकार परिषदांचा सपाटा मात्र कायम राहणार असल्याचे समजते. गेल्या काही काळापासून सातत्याने नरेंद्र मोदी व भाजपावर निशाणा साधण्याचे धोरण कायम राहणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रातही गुजरात पॅटर्न

गुजरात विधानसभा निवडणुकीपुर्वी हार्दिक पटेलने सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेत वातावरण तापवत ठेवले होते. त्याचा मोठा लाभ काँग्रेसला झाला. भाजपा अक्षरश: जेरील आल्याचे निकालाने दाखवून दिले. राज यांच्या माध्यमातून हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबविला जाण्याची शक्यता आहे.

Web Title:  The reason behind the reversal of MNS elections is 'Raj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.