Join us

जीन्स फॅक्टरीच्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:15 PM

पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. 

मुंबई - कांदिवली येथील दामूनगर परिसरात एमआयडीसीतील जीन्स फॅक्टरीला भीषण आग लागली होती. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाला चार मृतदेह या फॅक्टरीत आढळून आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. 

पोलीस घटनास्थळी पोहचले आणि घटनास्थळी सापडलेले ४ मृतदेह त्यांनी ताब्यात घेतले. ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आग लागल्यानंतर हे फॅक्टरीतील ३ कामगार बचावासाठी बाथरूममध्ये शिरले. मात्र, आग न विझल्याने त्यांना बाहेर निघताच आले नाही. या तिघांचा तिथेच मृत्यू झाला. एकाचा मृत्यू फॅक्टरीत झाला. अग्निशमन दलाच्या शोधकार्यात हे ४ मृतदेह आढळले. आगीची नोंद करून मिळालेल्या माहितीनुसार चौकशी करू असे पोलीस उपायुक्त राठोड यांनी सांगितले.

कांदिवलीच्या जीन्स फॅक्टरीमधील आगीत चौघांचा मृत्यू

टॅग्स :आगमृत्यूपोलिस