आम्हीही व्हिपचा उल्लेख करु शकलो असतो; दीपक केसरकरांनी सुनिल प्रभूंना चांगलच सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 07:56 PM2022-07-03T19:56:49+5:302022-07-03T20:02:49+5:30

सुनिल प्रभूंच्या विधानानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. 

Rebel MLA Deepak Kesarkar has criticized Shiv Sena MLA Sunil Prabhu. | आम्हीही व्हिपचा उल्लेख करु शकलो असतो; दीपक केसरकरांनी सुनिल प्रभूंना चांगलच सुनावलं!

आम्हीही व्हिपचा उल्लेख करु शकलो असतो; दीपक केसरकरांनी सुनिल प्रभूंना चांगलच सुनावलं!

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. 

शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. 

सदनात आमचा व्हिप जुगारुन ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही. ही खंत १३ कोटी जनतेच्या मनात असेल असं सांगत सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. सुनिल प्रभूंच्या या विधानानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. 

दीपक केसरकर म्हणाले की, हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या अभिनंदनाचं भाषण असल्याने राजकीय भाष्य करायचं नसतं. मगाशी येथे व्हिपचा उल्लेख झाला. आम्हीदेखील व्हीपचा उल्लेख करु शकलो असतो. आम्हीदेखील अपात्रतेची कारवाई करु शकतो. पण आज आम्हाला त्यावर बोलायचं नाही आहे, असं सांगत दीपक केसरकर यांनी सुनील प्रभू यांच्यावर टीका केली आहे.

पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली- मुख्यमंत्री

आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

Web Title: Rebel MLA Deepak Kesarkar has criticized Shiv Sena MLA Sunil Prabhu.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.