बलात्कारप्रकरणी हास्य अभिनेता रेहमान खानला १४ दिवस कोठडी

By admin | Published: March 11, 2016 02:17 AM2016-03-11T02:17:46+5:302016-03-11T02:17:46+5:30

एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हिंदी हास्य अभिनेता रेहमान खानला वालीव पोलिसांनी काल रात्री उशिरा कुर्ला येथून अटक केली. त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Rebellion Comedy actor Rehman Khan for 14 days | बलात्कारप्रकरणी हास्य अभिनेता रेहमान खानला १४ दिवस कोठडी

बलात्कारप्रकरणी हास्य अभिनेता रेहमान खानला १४ दिवस कोठडी

Next

वसई : एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हिंदी हास्य अभिनेता रेहमान खानला वालीव पोलिसांनी काल रात्री उशिरा कुर्ला येथून अटक केली. त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सांताकु्रझ येथे राहणाऱ्या तीस वर्षीय पिडीत महिलेची रेहमानशी सोशल नेटवर्कींगवरून ओळख झाली होती. तिचे पती आखाती देशात नोकरी करीत असून ती रेहमानची फॅन असल्याने त्यांची लगेचच मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर रेहमानने तिच्याकडून दोन लाख रुपये उसणे घेतले होते. पैशासाठी तिने तगादा लावल्यानंतर रेहमानने तिला पैसे देण्याच्या बहाण्याने मुंबई-अहमदाबाद हायवेवर ससुनवघर येथील सुवी पॅलेस हॉटेलमध्ये बोलावले होते. त्याठिकाणी रेहमानने तिच्यावर बलात्कार करून मारहाणही केली. तसेच तिचे अश्लिल फोटो प्रसारीत करण्याची धमकी देऊन अनेकवेळा बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Rebellion Comedy actor Rehman Khan for 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.