वांद्रे स्कायवॉकची पुनर्बांधणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:22 AM2020-02-14T01:22:05+5:302020-02-14T01:22:11+5:30
स्ट्रक्चरल आॅडिटनंतर निर्णय : मोठ्या दुरुस्तीची केली होती सूचना
मुंबई : धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या कामांना पालिकेने सुरुवात केली आहे. याचअंतर्गत वांद्रे येथील शहरातल्या पहिल्या स्कायवॉकची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या स्कायवॉकची मोठी दुरुस्ती करण्याची सूचना व्हीजेटीआय या तज्ज्ञ संस्थेने स्ट्रक्चरल आॅडिटनंतर केली आहे. मात्र हा स्कायवॉक पाडून त्याची पुनर्बांधणी करणेच योग्य ठरेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने २००८ मध्ये हा पूल बांधला. मात्र १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जून २०१९ रोजी वांद्रे येथील हा धोकादायक स्कायवॉक बंद करण्यात आला. त्यानंतर व्हिजेटीआयमार्फत पालिकेने या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यानुसार सदर संस्थेने गेल्या महिन्यात आपला अहवाल सादर केला. यामध्ये स्कायवॉकची मोठी दुरुस्ती सुचवली आहे.
या अहवालानुसार स्कायवॉकवरील भार कमी करण्यासाठी काँक्रिट स्लॅब काढणे, सात धोकादायक जिने पाडण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर या स्कायवॉकला आधार देण्यासाठी आणखी खांब उभे करणे, प्रत्येक खांबाच्या मध्ये १२ मीटर अंतर ठेवावे, असे सुचविण्यात आले आहे. मात्र या सर्व दुरुस्त्य्ािंनंतरही हा स्कायवॉक पाडून नवीन बांधणे योग्य ठरेल, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र याबाबत अंतिम निर्णय आयुक्त प्रवीण परदेशी घेणार आहेत.
वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक १.३ कि.मी. लांब आहे. त्याचे एक टोक कलानगरच्या दिशेने तर दुसरे टोक वांद्रे न्यायालयाच्या दिशेला जाते.
स्कायवॉकवरील भार कमी करण्यासाठी काँक्रिट स्लॅब काढणे, सात धोकादायक जिने पाडण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने केली
आहे.
स्कायवॉक पुन्हा सुरू करा
वांद्रे पूर्वला वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी), म्हाडा, एसआरए कार्यालय आणि कलानगर या परिसरांना हा स्कायवॉक जोडणारा असल्याने पादचाऱ्यांकडून याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. गेल्या वर्षी महापालिकेमार्फत दुरुस्तीच्या कारणाने बंद केला गेलेला स्कायवॉक अद्याप बंदच आहे. या ठिकाणी कार्यालयामध्ये येणाºया कर्मचाºयांचे हाल होत आहेत. या पादचाºयांना वांद्रे पूर्व येथील प्रचंड वाहतूक कोंडी होत असलेल्या रस्त्यावरून बीकेसी अथवा इतर भागात जाणाºया पादचाºयांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पिकअवरमध्ये तर या ठिकाणी चालणेही कठीण होऊन जाते. यामुळे लवकरात लवकर हा स्कायवॉक पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
च्एमएमआरडीएने वांद्रे पूर्व ते न्यायालय आणि पुढे कलानगर जंक्शनपर्यंत स्कायवॉक दहा वर्षांपूर्वी बांधला होता. वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी हा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.
च्या उड्डाणपुलासाठी या स्कायवॉकचा काही भाग गेल्या वर्षी रात्रीच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने तोडला होता. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक ते न्यायालयापर्यंतचा भाग सुरू ठेवला होता.
च्महापालिकेने जून २०१९ मध्ये दुरुस्तीच्या कारणाने स्कायवॉक पूर्ण बंद केला. अद्याप हा स्कायवॉक बंद असल्याने तो पुन्हा सुरू करण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे.