Join us  

राज्यभरातील ८१ महाविद्यालयांत अतिरिक्त तुकड्यांना मान्यता

By admin | Published: June 28, 2017 3:43 AM

महाराष्ट्र राज्य मंडाळाच्या बारावी परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे एफवायच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईसह राज्यभरात चांगली चुरस रंगलेली दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य मंडाळाच्या बारावी परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे एफवायच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईसह राज्यभरात चांगली चुरस रंगलेली दिसत आहे. पण राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यभरातील विद्यापीठांमधील ८१ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त तुकड्यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठातील २९ महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्यांची मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार आहे. राज्य सरकारने यंदा एकाही नव्या महाविद्यालयाला मान्यता न देण्याचे जाहीर केले होते. त्यातच राज्य मंडळासह सीबीएसई आणि आयसीएसईच्या बारावीचा निकाल चांगला लागल्याने प्रवेशात चुरस अधिकच वाढली होती. यासंदर्भात विद्यापीठांनी केलेल्या अर्जानुसार राज्य सरकारने अतिरिक्त तुडक्यांचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठासाठी २९ महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्यांची परवानगी देण्यात आली आहे. तर एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ही एका अतिरिक्त तुकडीला मान्यता देण्यात आली. विल्सन, के.सी., केळकर, वर्तक, दालमिया, बिर्लासह अनेक नामांकित महाविद्यालयांचा यात समावेश आहे. अनेक महाविद्यालयांत सेल्फ फायनान्सच्या तुकड्यांचा समावेश असून बी. एम. एस., बी. ए. फिल्म टेलिव्हिजन मीडिया प्रोडक्शन, बी. एस. स्सी हॉस्पिटॅलिटी, बी. कॉम. बँकिग अ‍ॅण्ड इश्युरन्स यासारख्या विषयांचा समावेश आहे. या अतिरिक्त तुकड्यांमुळे दोन ते तीन हजार जागा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.