समृद्धी महामार्गासाठी आता वेगळी कंपनी, मंत्रिमंडळाची मान्यता; कामाचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:45 AM2017-10-25T05:45:33+5:302017-10-25T05:45:35+5:30

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) अंमलबजावणी करण्यासह निधी उभारणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Recognition of a separate company, cabinet for the Samrudhiyya highway; Work will increase faster | समृद्धी महामार्गासाठी आता वेगळी कंपनी, मंत्रिमंडळाची मान्यता; कामाचा वेग वाढणार

समृद्धी महामार्गासाठी आता वेगळी कंपनी, मंत्रिमंडळाची मान्यता; कामाचा वेग वाढणार

Next

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) अंमलबजावणी करण्यासह निधी उभारणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची दुय्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणी करण्यासही मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार विशेष उद्देश वाहन कंपनीच्या भागभांडवलापैकी किमान ५१ टक्के भागभांडवल पूर्ण सवलत कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) राहणार आहे. तसेच दुय्यम कंपनीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, झोपडपट्टी विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (प्राधिकरण), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना संचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.
आजपर्यंत ३७१ गावांतील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे. तसेच ९८० हेक्टर क्षेत्र खरेदीने ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Web Title: Recognition of a separate company, cabinet for the Samrudhiyya highway; Work will increase faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.