Join us

पार्ल्यात अपक्ष उमेदवारीच्या निर्णयाचा पुनर्विचार करा; देवेंद्र फडणवीस यांची डॉ.दीपक सावंत यांना सूचना

By मनोहर कुंभेजकर | Published: October 27, 2024 5:37 PM

सावंत यांनी काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे १५ मिनिटे चर्चा केली.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची उमेदवारी शिंदे सेनेला मिळाली नसल्याने माजी आरोग्य मंत्री व उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे १५ मिनिटे चर्चा केली.

आपण विलेपार्ले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी खूप वर्षे वाट पाहिली. आपला येथून विचार झाला नसल्याने अपक्ष म्हणून अर्ज  भरण्यासाठी आग्रही आहे.पदवीधर निवडणूकीतही शिंदे सेनेची जागा असतांना आपल्याला तिकीट नाकारले गेले.आजपर्यंत आपल्याला दिलेल्या आश्वासनाचा दाखला देत आपल्याला आता थांबणे कठीण आहे असे आपण उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

भविष्यकाळात वेगळा विचार करता येईल पण यावर पुन्हाआपण एकदा विचार करावा फडणवीस यांनी सांगितले.  यावर नजिकच्या भविष्यकाळात तसे ठोस काहीच नाही असे आपण त्यांना सांगितल्याची माहिती डॉ.सावंत यांनी दिली. यापूर्वी मुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना आपल्याला पार्ल्यात अपक्ष लढण्यास परवानगी द्यावी असे पत्र आपण त्यांना दिल्याची माहिती त्यामी यावेळी दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस