शिधावाटप कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:12 AM2017-12-07T02:12:45+5:302017-12-07T02:12:45+5:30
मालाड (पश्चिम) येथील शिधावाटप कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्याबाबत शिधघवाटप अधिकाºयांनी पोलिसांकडे लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई : मालाड (पश्चिम) येथील शिधावाटप कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्याबाबत शिधघवाटप अधिकाºयांनी पोलिसांकडे लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिधावाटप कार्यालय क्रमांक ४२ येथे तथाकथित समाजसेवक आणि दलालांचा वावर असतो. शिधापत्रिकेच्या कामासाठी येणाºया नागरिकांची दिशाभूल करून हे दलाल त्यांची फसवणूक करीत असतात. त्याचप्रमाणे तथाकथित समाजसेवक नियमबाह्य कामे करून घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाºयांवर दबाव टाकत असतात, अशी तक्रार राष्ट्रीय अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री, पोलीस आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
मालाड शिधावाटप कार्यालयातील दलालांविरूद्ध आलेल्या या तक्रारीची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र शिधावाटप अधिकारी कार्यालय क्र. ४२ यांनी उपनियंत्रक शिधावाटप यांना पाठवले आहे. याबाबत शिधावाटप अधिकाºयांनी मालाड, कुरार आणि दिंंडोशी पोलीस ठाण्यांमध्ये या दलालांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे.
ही पत्रे देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने दलालांचा सुळसुळाट अद्याप कायम असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. याबाबत मोहन कृष्णन यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री, पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करून शिधावाटप अधिकाºयांच्या पत्राची दखल घेत दलालांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.