लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसरच्या रतन नगरच्या वाहतूक पुलाची पुनर्बांधणी शिवसेनेचे माजी विभागप्रमुख दिवंगत प्रकाश कारकर यांच्या संकल्पनेतून आणि विधी-महसूल समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ६ चे स्थानिक नगरसेवक हर्षद कारकर यांनी साकारली. यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रतन नगर येथे एकमार्गी वाहतूक पुलाच्या पुनर्बांधणीचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर तसेच शिवसेना विभागप्रमुख आणि आमदार विलास पोतनीस आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागठाणे विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
--------------------------------