Join us

आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ; ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक प्रीमियम वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 3:56 AM

इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाकडून (आयआरडीएआय) नॉन लाइफ इन्श्युरन्स क्षेत्रातल्या आर्थिक उलाढालीची माहिती हाती आली आहे.

मुंबई : आरोग्य विम्याप्रति असलेली भारतीय समाजाची अनास्था कोरोनामुळे दूर होत असून, हा विमा काढणाऱ्यांच्या प्रमाणात आॅगस्टमध्ये तब्बल ३६ टक्के एवढी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली.केवळ आरोग्य विमा विकणाºया कंपन्यांनी या महिन्यात १,४६२ कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला. गतवर्षी ही रक्कम १,०७२ कोटीइतकी होती. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत या विमा कंपन्यांना प्रीमियमपोटी १,२७८ कोटी रुपये जास्त मिळाले आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाकडून (आयआरडीएआय) नॉन लाइफ इन्श्युरन्स क्षेत्रातल्या आर्थिक उलाढालीची माहिती हाती आली आहे.विमा कंपन्या शेतापासून ते वैयक्तिक दुर्घटनांपर्यंत आणि आगीपासून ते क्रेडिट गॅरंटीपर्यंत जवळपास १५ प्रकारांमध्ये विम्याचे संरक्षण देतात.या सर्व क्षेत्रांतील विम्याच्या प्रीमियमपोटी खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना ७३ हजार ९६५ कोटींचा प्रीमियम गेल्या पाचमहिन्यांत मिळाला.गेल्या वर्षी याच कालावधीतल्या प्रीमियमची रक्कम ७१ हजार ४०६ कोटी इतकी होती. आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण ७.९८ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास येते.मात्र, गेल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या भीतिपोटी पॉलिसी काढणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढून ही वाढ ३६ टक्क्यांवर गेली. कोरोनापूर्व काळापर्यंत देशात आरोग्य विमा असलेल्या नागरिकांचे प्रमाण जेमतेम ९ टक्के होते.पॉलिसींची संख्या वाढलीदेशात कोरोना दाखल होण्यापूर्वी आरोग्य विम्याच्या सुमारे ५०० प्रकारच्या पॉलिसी होत्या. मात्र, गेल्या तीन महिन्यांत त्यात नव्याने १५० पॉलिसींची भर पडली आहे. आयआरडीएआयच्या आदेशानुसार, विमा कंपन्यांनी काढलेल्या ‘कोरोना रक्षक’ आणि ‘कोरोना कवच’ या पॉलिसी घेण्याचे प्रमाणही वाढले असून, दररोज देशात एक लाख लोकांकडून या पॉलिसी काढल्या जात असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.आता ई विमा पॉलिसीकोरोना काळात विमा काढण्यासाठी इन्शुरन्स एजंटच्या भेटीगाठींसह आवश्यक कागदपत्रांची देवाणघेवाण, त्यावर स्वाक्षरी करणे ही प्रक्रिया कटकटीची ठरत होती. परंतु, आता आरोग्य विम्यासह सर्वच प्रकारचा विमा काढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व व्यवहार आॅनलाइन करण्याची मुभा इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाने दिली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्य