आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:53 PM2020-09-10T16:53:38+5:302020-09-10T16:54:10+5:30

आँगस्ट महिन्यांत सर्वाधिक प्रिमियम वसुली

Record 36% increase in health insurance | आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ

आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ

Next

कोरोनाची भीती कारणीभूत

मुंबई :  आरोग्य विम्याप्रती असलेली भारतीय समाजाची अनास्था कोरोनामुळे दूर होत असून हा विमा काढणा-यांच्या प्रमाणात आँगस्ट महिन्यांत तब्बल ३६ टक्के एवढी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. केवळ आरोग्य विमा विकणा-या कंपन्यांनी या महिन्यांत १४६२ कोटी रुपयांचा प्रिमियम गोळा केला आहे. गतवर्षी ती रक्कम १०७२ कोटी इतकी होती. तसेच, एप्रिल ते आँगस्ट या पाच महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत या विमा कंपन्यांना प्रिमियमपोटी १२७८ कोटी रुपये जास्त मिळाले आहेत.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरिटी आँफ इंडियाकडून (आयआरडीएआय) नाँन लाईफ इन्श्युरन्स क्षेत्रातल्या आर्थिक उलाढालीची माहिती हाती आली आहे. त्यात सर्वाधिक हिस्सा आरोग्य विम्याचा असल्याचे ही आकडेवारी सांगते. विमा कंपन्या शेतापासून ते वैयक्तिक दुर्घटनांपर्यंत आणि आगीपासून ते क्रिडिट गँरण्टीपर्यंत जवळपास १५ प्रकारांमध्ये विम्याचे संरक्षण देतात. या सर्व क्षेत्रातील विम्याच्या प्रिमियमपोटी खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना ७३ हजार ९६५ कोटी रुपयांचा प्रिमियम गेल्या पाच महिन्यांत मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतल्या प्रिमियमची रक्कम ७१ हजार ४०६ कोटी इतकी होती. आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास आरोग्य विमा काढण्याच्या प्रमाण ७.९८ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास येते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या भितीपोटी पाँलिसी काढणा-यांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून ती वाढ ३६ टक्क्यांवर गेली आहे. कोरोनापूर्व काळापर्यंत देशात आरोग्य विमा असलेल्या नागरिकांचे प्रमाण जेमतेम ९ टक्के होते. त्यातही आता वाढ होईल असे आकडेवारीवरून निदर्शनास येते.

 

पाँलिसींची संख्या वाढली 

देशात कोरोना दाखल होण्यापूर्वी आरोग्य विम्याच्या सुमारे ५०० प्रकारच्या पाँलिसी सक्रिय होत्या. मात्र, गेल्या तीन महिन्यांत त्यात नव्याने १५० पाँलिसींची भर पडली आहे. आयआरडीएआयच्या आदेशानुसार विमा कंपन्यांनी काढलेल्या कोरोना रक्षक आणि कोरोना कवच या पाँलिसी घेण्याचे प्रमाणही वाढले असून दररोज देशात एक लाख लोकांकडून या पाँलिसी काढल्या जात असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे.  

 

मोटार इन्शुरन्स पडला मागे

विमा कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये सर्वाधिक हिस्सा हा मोटार विम्याचा होता. मात्र, जून अखेरीपर्यंत मोटार विम्याचा वाटा ३८ टक्के तर आरोग्य विम्याचा हिस्सा ३० टक्के होता. मात्र, आँगस्ट अखेरीस अरोग्य विमा ३३ टक्क्यांवर पोहचला असून मोटार विम्याच्या प्रिमियमची रक्कम घसरून ३० टक्क्यांवर आली आहे. आरोग्य विमा काढल्यामुळे ही टक्केवारी वाढली आहे. मात्र, लाँकडाऊनच्या काळात अनेकांनी वाहन विम्याचे नुतनिकरण केले नसल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखीत होते.

Web Title: Record 36% increase in health insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.