मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार ६८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ८२ हजार ७६ इतकी झाली आहे. राज्यभरात सध्या ६३ हजार ४ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ५ हजार ८६१ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत एकूण बरे झालेल्यांची संख्या ६१ लाख ८० हजार ८७१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात दिवसभरात १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार ७३० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.