मुंबईत नऊ वर्षांतली विक्रमी गृहविक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 06:53 PM2020-12-10T18:53:27+5:302020-12-10T18:53:44+5:30

Record home sales in Mumbai : २०१२, २०१३, २०१५, २०१६ च्या तुलनेत दुप्पट विक्री

Record home sales in Mumbai in nine years | मुंबईत नऊ वर्षांतली विक्रमी गृहविक्री

मुंबईत नऊ वर्षांतली विक्रमी गृहविक्री

Next

२०१२,२०१३,२०१५, २०१६ च्या तुलनेत दुप्पट विक्री

मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतल्या गृह विक्रीची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असतानाच नोव्हेंबर महिन्यांतील ही गृह विक्री गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हाती आली आहे. २०१२ ते २०१९ या कालावधीतल्या सप्टेंबर महिन्यांतील सर्वाधिक ६२३० घरांची विक्री २०१७ साली झाली होती.  यंदा ती ९३०१ एवढी वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर, २०२० या ११ महिन्यांतल्या सर्वाधिक गृह विक्रीचा विक्रमही याच महिन्यांत नोंदविला गेला आहे.

मुंबईत परवडणा-या घरांच्या विक्री सर्वाधिक होत आहे. मात्र, उच्चभ्रूंच्या वस्तीतल्या घरांच्या विक्रीचे प्रमाणाही चांगले आहे. त्यामुळे मुंबईत विक्री झालेल्या घरांची किंमत १ कोटी ५२ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ती किंमत १ लाख ६९ हजार एवढी वाढली होती. तर, आँगस्ट, २२० मध्ये ती १ कोटी ३४ लाखांपर्यंत खाली घसरली होती अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून हाती आली आहे. घरांच्या विक्रीतून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ५४२ कोटी रुपये जामा झाले होते. सरकारने त्यात सवलत दिल्यामुळे यंदा नोव्हेंबर महिन्यांत हा महसूल २८८ कोटींपर्यंतच जमा झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत सर्वाधिक १०८६४ घरांची विक्री झाली होती. यंदा आँक्टोबर आणि नोव्होंबर या दोन्ही महिन्यांत अनुक्रमे ११६४० आणि १४३९५ घरांची विक्री झाल्याची माहिती प्राँप टायगर या संस्थेकडून हाती आली आहे.

 
आर्थिक मंदी पथ्यावर

नोटबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे बांधकाम व्यवसायाचा डोलारा डळमळीत झाला होता. कोरोना संकटामुळे हा व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला होता. जागतिक मंदीमुळे घरांच्या खरेदी विक्रीवर विपरित परिणाम होईल आणि हा व्यवसाय कोलमडून पडेल अशी भीती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आणि विकासकांनीसुध्दा घसघशीत सवलती देण्यास सुरूवात केली. बँकांचे व्याजदरही कमी झाले. त्यामुळे या व्यवसायात पुन्ही तेजी निर्माण झाली आहे.   

नोव्हेंबर महिन्यांत झालेले मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे  

वर्ष

नोंदणी झालेले दस्त

२०१२

४२४७

२०१३

३८५९

२०१४

५००१

२०१५

४२२१

२०१६

३८३८

२०१७

६२३०

२०१८

५१९०

२०१९

५५७४

२०२०

९३०१

 

 

२०२० साली झालेले मालमत्तांचे व्यवहार

महिना

विक्री झालेल्या घरांची संख्या

नोव्हेंबर

९३०१

आँक्टोबर

७९२९

सप्टेंबर

५५९७

आँगस्ट

२६४२

जुलै

२६६२

जुन

१८३९

मे

२०७

एप्रिल

-

मार्च

३७९८

फेब्रुवारी

५९२७

जानेवारी

६१५०

 

Web Title: Record home sales in Mumbai in nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.